ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून बदलापूर या शहरात ओळखले जाते.
मुंबईसह उपनगरात राहणारे नागरिक अधिक नागरिक बदलापूर शहरात स्थलांतरित होताना आपल्याला पाहायल मिळत आहे.
मात्र अनेकांना बदलापूर या शहराच नाव कसे पडले असेल हे माहिती नसेल?
बदलापूर या शहराचे नाव पडण्यामागे विविध आख्यायिका आहेत.
एका आख्यायिकानुसार,छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या भागात घोड्यांची अदलाबदल होत असे,त्यावरुन बदलापूर हे नाव पडले.
बदलापूरपासून काही अंतरावर बारवी नदी आहे.या नदीच्या काठावर चोण हे नावाचे ठिकाण होते. चोण अर्थात पेशवे काळात असताना त्याला बदलापूर असे म्हटले जायचे.
वसईच्या महत्त्वाच्या मोहिमेवेळी चिमाजी आप्पा बदलापूरमध्ये मुक्कामास होत असल्याचे समजते शिवाय काही महत्त्वाची युद्द बदलापूर येथे पार पडले होते.