ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंधव्यक्ती सामान्य लोकांसारखे मैदानी खेळ खेळू शकत नाहीत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणावर होणाऱ्या सणांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत हा विचार चुकीचा ठरवत नयन फाऊंडेशन काम करत आहेत.
नयन फाऊंडेशन हे अंध व्यक्तींसाठी १ मे २०१० पासून काम करत आहे.
अंध तरुणांना सामान्य तरुणांप्रमाणे काही दिवस नव्या गोष्टी अनुभवता याव्यात. खेळ खेळता यावे, भटकंती करता यावी यासाठी नयन फाऊंडेशन काम करत आहे.
हा विचार जेव्हा रुईयाच्या विद्यार्थ्यांकडे गेला तेव्हा विद्यार्थी आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करू असं म्हणत नयन फाऊंडेशनमध्ये सहभागी झाले.
पुढे जगात काहीच अशक्य नाही असं साध्य करत सन २०१३ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नगरसेवकाच्या आयोजित दहीहंडी उत्सवात नयन फाऊंडेशनने साडे तीन थर रचत पथकात मान मिळवला.
रुईया नाका/ पार्किंग येथेच फाऊंडेशनच्या बैठका पार पडतात. तिथल्या दडकर मैदानात दहीहंडीचा सराव होतो.
दहीहंडी उत्सवातील बक्षीस रक्कमेचा एक वाटा दृष्टीहीन / अंशतः दृष्टीहीनांना समान वाटला जातो.
गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचा अट्टाहास फाऊंडेशनच्या तरुणांचा असतो. भविष्यात स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनात दृष्टीहीनाचा हात हातात घेऊन विविध सामाजिक उपक्रमाने सामाजिक भान जपण्याचा मानस संस्थेचा आहे.