ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वातावरणातील बदलांचा परिणाम लगेच त्वचेवर दिसून येतो.
वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तुमच्या त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण आवश्यक असतं.
त्वतेची खासकर हातांच्या त्वचेची काळजी योग्य पद्धतीनं न घेतल्यास हाताची त्वचा काळपट आणि खरखरीत होते.
हातावरील काळपटपणा दूर करण्यासाठी या घरगुती टिप्स करा फॉलो.
एका वाटीमध्ये कोरफड जेल आणि कॉफी पावडर घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या.
त्यानंतर हा पॅक हातांना लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्याभागातील रक्तस्राव सुरळीत राहातो.
त्यानंतर हातावरील पॅक १० ते १५ मिनिटं सुकण्यासाठी ठेवा. त्यानंतर हातावरील पॅक थंड पाण्यानी धूवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.