Ashish Shilar On Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Ashish Shelar Letter : 'म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात', संजय राऊतांना आशिष शेलार यांनी लिहिलं खरमरीत पत्र; वाचा...

साम टिव्ही ब्युरो

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामानाच्या रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यालाच आता भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी X वर राऊतांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख 'श्रीमान मोरारजी राऊत', असा केला आहे.

आपल्या पत्रात आशिष शेलार म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नवीन विकास प्रकल्प होणार, असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून अग्रलेख लिहितात?''

ते म्हणाले, ''आता ‍विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन लंका केलं? या सगळयांना युनियन बनवून कोणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले त्यांचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाजपासून सगळ्या कारखान्यांमध्ये ठाकरे गटाची युनियन होती ना?''

पत्रात शेलार यांनी पुढे म्हटलं आहे की, ''वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय? मराठी कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या ठाकरे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणासावर गोळ्या झाडणाऱ्या स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना?''

शेलार म्हणाले, ''काँग्रसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का?'' 'म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहेत', असं त्यांनी पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT