Sanjay Raut: शिवसेना सुनावणीवर सुप्रीम कोर्टाकडून 'तारीख पे तारीख'! संजय राऊत संतापले, मोदी- शहांवर हल्लाबोल; VIDEO

Maharashtra Politics Breaking News: शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीची तारीख लांबणीवर गेल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
Sanjay Raut: शिवसेना सुनावणीवर सुप्रीम कोर्टाकडून 'तारीख पे तारीख',  संजय राऊत संतापले; मोदी- शहांवर हल्लाबोल!
Sanjay Raut NewsSaam tv
Published On

मयुर राणे, ता. १५ जुलै २०२४

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टामधील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली नसून प्रत्येकवेळी नवी तारीख दिली जात आहे. काल पुन्हा एकदा या सुनावणीची तारीख लांबणीवर गेल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"तारीख पे तारीख.. १४ जुलैला होणारी सुनावणी १४ ऑगस्टवर गेली. यातून पक्षांतर करणाऱ्या अन् क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळते. खरं म्हणजे देशातील घटनाबाह्य सरकार रोखण्याचे काम न्यायव्यवस्था अन् संविधानाचे आहे. पण आपले न्यायलय ही नरेंद्र मोदी अन् अमित शहांच्या दबावाखाली काम करतात का? अशी लोकांना शंका येऊ लागली आहे"

महाराष्ट्रामध्ये ज्याप्रकारे क्रॉस वोटिंग झालं. त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे, पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये यांच्यावर आम्ही तारखांवर तारखा घेतोय, कारवाई करत नाही. त्यामुळेच यांची भिती चेपली आहे. आम्ही एका पक्षाच्या तिकीटावर निवडून यायचं आणि कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्याला मतदान करायचं," असा घणाघात राऊतांनी केला.

Sanjay Raut: शिवसेना सुनावणीवर सुप्रीम कोर्टाकडून 'तारीख पे तारीख',  संजय राऊत संतापले; मोदी- शहांवर हल्लाबोल!
VIDEO: अतिउत्साह नडला! अंजनेरी गडावर अचानक पाणी वाढलं, १० पर्यटक अडकले; हातात हात घालून उभे राहिले, ६ तासांचा थरार, पाहा

"केंद्र सरकार संविधान हत्या दिन साजरा करणार आहे. मात्र महाराष्ट्रातील सरकार चालवणं हीच संविधानाची हत्या आहे. मोदी- शहांना संविधानाची चिंता असेल तर त्यांचा पक्ष तसं काम करतोय का? संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे, मात्र आम्हाला तारखा दिल्या जात आहेत. ही तारीख म्हणजेच संविधानाची हत्या आहे," असंही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: शिवसेना सुनावणीवर सुप्रीम कोर्टाकडून 'तारीख पे तारीख',  संजय राऊत संतापले; मोदी- शहांवर हल्लाबोल!
Pune Crime News : जेवणाची चव बिघडली, आचाऱ्यांच्या नाकावर मारला हातोडा; पुढे घडलं असं काही की तुम्हालाही बसेल धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com