Ashadhi Wari  Saamtv
मुंबई/पुणे

Ashadhi Wari 2024 Marg: आषाढी पायी वारीच्या मार्गामध्ये बदल, असा असेल नवा मार्ग; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ashadhi Wari 2024 Path: देहूतून संत तुकोबांची पालखी २९ जूनला पिंपरी चिंचवडच्या दिशेने मार्गस्त होणार आहे. तर ३० जूनला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

रोहिदास गाडगे

आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari 2024) सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आषाढी पायी वारीसाठी देहू आणि आळंदीतून पालखी प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpari Chinchwad Police) वाहतूक मार्गात बदल केले आहेत. वारकऱ्यांना आणि प्रवाश्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पायी वारीसाठीचा नवा मार्ग कसा असेल ते आपण जाणून घेणार आहोत...

देहूतून संत तुकोबांची पालखी २९ जूनला पिंपरी चिंचवडच्या दिशेने मार्गस्त होणार आहे. तर ३० जूनला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. या दरम्यान वारकऱ्यांना आणि प्रवाश्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी म्हणून पायी वारीच्या वाहतूक मार्गामध्ये बदल केला आहे.

आळंदी आणि देहू शहरात येणारे रस्ते आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि आळंदी ते पुणे मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली की रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी नगरी सज्ज झाली आहे. पालखी सोहळ्यासाठी देहू आणि आळंदी नगरी सजली आहे. या रथाची संपूर्ण डागडुजी, चांदीचं पॉलिश करण्यात आलं आहे. पालोखी सोहळ्यासाठीची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा शासनाने पालखी सोहळ्यातील दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साई दरबारी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Hidden Maharashtra Waterfall : महाराष्ट्रातले हे Top 8 धबधबे विकेंड प्लॅनसाठी ठरतील बेस्ट

Sonalee Kulkarni: मन साडीत, पैठणीत, पोलक्या परकरात…, युरोपीयन मराठी संमेलनातील अप्सराचा खास लूक पाहिलात का?

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT