ajit pawar on raj thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : राज ठाकरेंना मुलगाही निवडून आणता आला नाही; अजित पवारांचा जोरदार निशाणा

Ajit Pawar on raj thackeray : विधानसभा निवडणुकांच्या निकालावर संशय व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंवर अजित पवार यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंना मुलगाही निवडून आणता आला नाही, अशा शब्दात अजित पवारांनी टीका केली.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडी आणि मनसेला धूळ चारली. विधानसभा निवडणुकीत मनसेला खातेही उघडता आलं नाही. विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी निकालावर संशय व्यक्त केला. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनाही निकाल मान्य केला नव्हता. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. राज ठाकरेंनीही विधानसभा निवडणुकीवर संशय व्यक्त केला. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांची जिल्हा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका घेणाऱ्या राज ठाकरेंवर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले, 'तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही. तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली. तेव्हा आम्ही रडत नाही बसलो'.

लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही. पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी सर्व्हे सुरु आहे'.

'डीपीडीसीसाठी सर्व जिल्ह्यांना मागील वेळेपेक्षा जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे अजित पवार पुढे म्हणाले.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रारी आल्या आहेत. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजाबद्दल असे विधान करायला नको होते. पोलीस त्याची तपासणी करून कारवाई करतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई हादरली! मध्यरात्री रिसॉर्टमध्ये गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

Reheated rice: कालचा भात गरम करून खाण्यापूर्वी हे नक्की वाचा; एका चुकीमुळे होईल फूड पॉइझनिंग!

Kuchu Puchu Meaning : कुचू-पुचू म्हणजे नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या Gen Z स्लँग्सचा मजेशीर अर्थ जाणून घ्या

Ratnadurg Fort : रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यात दडली आहेत अनेक रहस्ये, एकदा जाणून घ्याच

SCROLL FOR NEXT