Thackeray Group : उद्धव ठाकरेंना अमरावतीत मोठा हादरा; तालुका प्रमुखासह शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Shivsena UBT Group : अमरावतीमध्ये ठाकरे गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली. यामुळे बरेचसे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले होते. नाराजी व्यक्त करत निष्ठावंतांनी राजीनामा दिला असे म्हटले जात आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Shivsena UBT Group News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंगला सुरुवातही झाली आहे. या धामधुमीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडत आहे असल्याच्या चर्चा होत आहेत. अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखाने पक्षाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मागील काही दिवसांपासून गळती लागल्याची चर्चा होत आहे. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी तालुकाप्रमुख सुनील डिके यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराजी व्यक्त करत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.

अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का बसला आहे. तालुक्यात आणि अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटात अनेक पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे तेथील निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले. त्यामुळे माजी तालुकाप्रमुखाने पदाधिकारी आणि शिवसैनिकांसह पक्षातून राजीनामा दिला.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : शिवसेनेत गटबाजी उफाळली? एकनाथ शिंदेंचं नाव घेत दादांनी स्पष्टच सांगितलं

अमरावतीमध्ये स्थानिक आमदार ठाकरे गटाचा असूनही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याआधी जालन्यातील जिल्हाप्रमुखाने पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला होता. पुण्यात ठाकरे गटाचे ४ आमदार शिंदेच्या संपर्कात असून ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पक्षांतर करु शकतात अशी चर्चा होत आहे.

Uddhav Thackeray
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींचं मेक इन इंडिया चांगलं होतं, पण...; लोकसभेत राहुल गांधींची शेलक्या शब्दात टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com