Saam Tv
बाजारातील मोमोज खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा गव्हाचे पीठ, पनीर आणि मसालेदार ग्रेव्हीपासून तयार होणारे चविष्ट मोमोज.
या मोमोजमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ आणि सारणासाठी प्रथिनयुक्त पनीर वापरले जाते.
अर्धा कप गव्हाचे पीठ,१०० ग्रॅम किसलेले किंवा कुस्करलेले पनीर,१ चमचा चिली फ्लेक्स,अर्धा चमचा काळी मिरी,चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी आणि तेल
पाव कप शेंगदाणे,२ चमचे पांढरे तीळ,१० ते १२ बदाम,३ ते ४ भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या, १ चमचा गूळ पावडर, भाजलेले जिरे आणि काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ
गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. दुसरीकडे पनीरमध्ये चिली फ्लेक्स, काळी मिरी आणि मीठ घालून चांगले एकत्र करा.
पिठाच्या छोटे गोळ्या करून पातळ पोळ्या लाटा. त्यांचे गोल काप करून मध्यभागी पनीरचे सारण भरा. मोमोजना घड्या घालून कडा व्यवस्थित बंद करा. त्यानंतर स्टीमरमध्ये ७ ते ८ मिनिटे वाफवून घ्या.
शेंगदाणे, तीळ आणि बदाम हलके भाजून घ्या. त्यात भिजवलेल्या काश्मिरी मिरच्या आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यात गूळ, मीठ, जिरेपूड आणि काळी मिरी घालून मंद आचेवर काही मिनिटे शिजवा.
चिली फ्लेक्स, लाल तिखट, तीळ आणि मीठ एकत्र करून त्यावर गरम तेल घाला. तयार मोमोज क्रीमी झोलमध्ये टाका आणि वरून चिली ऑईल घाला. आणि सर्व्ह करा
NEXT : पगारापासून बँक बॅलन्सपर्यंत...; 'या' 5 गोष्टी मरेपर्यंत कोणाला सांगू नका