Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा 'सशर्त' स्वबळाचा नारा; स्वबळ की उभारीसाठी खेळ? पाहा स्पेशल रिपोर्ट

Uddhav Thackeray Latest News : कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्बबळाचा नारा दिला खरा...मात्र त्यांनी यासाठी आपल्या शिवसैनिकांसमोर अट ठेवली. नेमकी ही अट काय आहे? ((यावर काँग्रेस आणि शरद पवारांनी काय भूमिका घेतलीय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

मविआत पुन्हा स्वबळावरून जुंपलीय. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिलाय. कारण राज्यातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तसा आग्रह धरलाय. मात्र यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. राज्यभर बळ दाखवा त्यानंतरच स्वबळाचा विचार करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. बैठकीत नेमकं काय झालं ते पाहूयात....

ठाकरेंचा 'सशर्त' स्वबळाचा नारा

स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन

राज्यभर बळ दाखवा मग स्वबळाचा निर्णय घेऊ

पक्ष वाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्त्व तयार करणं गरजेचं

स्थानिक नेतृत्त्वाला सक्षम करणं गरजेचं असल्याचं काही नेत्यांनी बैठकीत सांगितलं.

तसंच संपर्कप्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेपही कमी करण्याची मागणी नेत्यांनी केली.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं घेतलेल्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे ही भूमिका मांडली होती.

ठाकरे गटाची स्वबळाची तयारी?

काँग्रेसनं मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचं स्वागत केलंय. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याशी चर्चा केल्यानुसार ते एवढ्या टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही असा विश्वास पवारांनी व्यक्त केलाय.

विधानसभेतल्या पराभवानंतर पक्षाला उभारी देण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच ठाकरेंनी सशर्त स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे. मात्र यामुले कार्यकर्ते बळ वाढणार की आघाडीचाच खल होणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com