
Raj Thackeray : पुण्यात मागील दोन दिवसांपासून मराठी विश्व संमेलन सुरु होते. आज (२ फेब्रुवारी) संमेलनाची सांगता झाली. या सांगता समारोहाला मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सांगता समारोहात राज ठाकरे यांनी मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय करायले हवे यावर भाष्य केले.
राज ठाकरे म्हणाले, 'मराठी जपण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. आम्हाला आमच्या पद्धतीने काम करु द्या. मी माझं काम करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत रहा. या सगळ्या पद्धतीच्या नद्यांचा संगम झाल्यावर मराठीचे अस्तित्व कोणीही पुसू शकणार नाही. मराठी भाषेसाठी उदय सामंत जी तुम्हाला मदत होईल ती आम्ही करु. मराठीसाठी आम्ही जे करु त्याला तुम्ही पाठिंबा द्या. पण यावरुन आमच्यावर केसेस टाकू नका.'
ते पुढे म्हणाले, 'मराठी भाषेचे अस्तित्त्व राहिले पाहिजे. जिथे जिथे मराठी, महाराष्ट्र जपता येईल तिथे तिथे जपा. मराठीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एक चित्रपट घेऊन येत आहेत. आता संभाजी महाराजांवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आपल्या महापुरुषांना जातीपातीमध्ये अडकवले नाही पाहिजे. प्रत्येक महापुरुष हा आपलाच आहे. जातीपातीमधून महाराष्ट्र बाहेर येण्याची गरज आहे.'
'साहित्यिकांना विनंती आहे. तुम्ही आम्हाला मार्ग दाखवायला हवा. पूर्वी साहित्यिक राजकीय मत मांडायचे, आता मला ते दिसत नाही. चांगलं काय, वाईट काय, त्यांनी समाजाला सांगितले पाहिजे. तरुणाईने साहित्य वाचून त्यातून बोध घेतला पाहिजे. संमेलनातून जेव्हा बाहेर पडाल, तेव्हा १० पुस्तके घेतली पाहिजे' असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.