Maharashtra Kesari 2025 : "माझी पाठ टेकलीच नाही, रिप्ले दाखवा", शिवराज राक्षे पंचांवर का भडकला?

Shivraj Raksha Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेमध्ये राडा झाला आहे. गादी विभागाच्या सामन्यादरम्यान शिवराज राक्षे या कुस्तीपटूने पंचांची कॉलर पकडली, पंचांना लाथ देखील मारली. या राड्यामुळे स्पर्धेला गालबोट लागले आहे.
Maharashtra Kesari Live
Maharashtra Kesari LiveSaam Tv (Youtube)
Published On

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेत राडा झाला आहे. या स्पर्धेतील गादी विभागाच्या अंतर्गत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरु असताना वाद सुरु झाला. पंचांनी दिलेल्या निर्णयावर कुस्तीपटू शिवराज राक्षेने नाराजी व्यक्त केली. त्याने पंचांची कॉलर ओढत त्यांना लाथ मारली. या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेला गालबोट लागले आहे.

या घटनेवर शिवराज राक्षेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझी पाठ टेकलीच नाही. पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला. मल्लाला १० ते १५ मिनिटे वेळ द्यायला पाहिजे. बॉडी गरम व्हायला वेळ द्यायला हवा. आमची एकच मागणी आहे. सामन्याचा रिप्ले दाखवा. हरलो हे आम्हाला मान्य करु. पण जनतेला सामन्याचा रिप्ले दाखवा' असे कुस्तीपटू शिवराज राक्षे म्हणाला.

महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ हे दोन कुस्तीपटू एकमेकांसमोर होते. या लढतीत पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला चितपट केले. पंचांनी पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्याचे घोषित केले. यावर राक्षेने आक्षेप घेतला आणि हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे सांगितले.

Maharashtra Kesari Live
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीत राडा! कॉलर ओढली, छाताड्यात लाथ घातली; शिवराज राक्षेचा पंचांवर राग अनावर- VIDEO

दरम्यान सामन्यातील निर्णयावरुन शिवराज राक्षेने पंचांनी जोरदार लाथ मारली. त्याने कॉलरदेखील पकडली. या राड्याची सर्वत्र चर्चा होत आहे. निर्णयावर आक्षेप घेणे गैर नाही. पण पंचांना लाथ मारणे योग्य नाही अशा प्रतिक्रिया सगळीकडून येत आहेत.

Maharashtra Kesari Live
Raj Thackeray : मराठीसाठी आम्ही जे करु त्याला पाठिंबा द्या, आमच्यावर केसेस टाकू नका - राज ठाकरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com