Raj Thackeray: भारतीय असूनही मराठी माणसाला हिमाचल प्रदेशात जमीन घेता येत नाही; परप्रांतीयांवरून राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray In Vishwa Marathi Sahitya Sammelan: मराठी माणसाचे अस्तित्व शहरात असावे, यासाठी राज्य सरकारने टिकविले पाहिजे. जर आपलीच लोकं राज्यात बेघर होत असतील तर तो विकास नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.
Raj Thackeray: भारतीय असूनही मराठी माणसाला हिमाचल प्रदेशात जमीन घेता येत नाही; परप्रांतीयांवरून राज ठाकरे कडाडले
Published On

मराठी साहित्य संमेलनात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील परप्रांतीयांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. भारतीय असूनही मराठी माणसाला दुसऱ्या राज्यात जमीन घेता येत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यात वाढणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांवरून सरकारवर टीका केलीय. शहरातील मराठी माणूस बेघर होतोय, परप्रांतीयांच्या ताब्यात जमिनी जात आहेत, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.

मराठी माणसाचे अस्तित्व शहरात असावे, यासाठी राज्य सरकारने टिकविले पाहिजे. आमची लोकं आमच्या राज्यात बेघर होणार असतील तर त्याला विकास म्हणत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जर गेला तर तिथे तुम्हाला जमीन विकत घेता येत नाही. भारतीय असून सुद्धा पण आमच्याकडे तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, अशी स्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.

अभिनेते रितेश देशमुख यांना राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.यावरून राज ठाकरेंनी चपखल मारलीय. मराठी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आम्हाला तिरस्कार मिळत असतो. पण तिरस्कार सहन करत आम्हाला पुढे वाटचाल करावी. मराठी भाषेसाठी आपल्याला बऱ्याच करण्यासारखं आहे. आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे, त्यानंतर लोक आपला अभिमान करतात. आपल्या देशातही, अशी राज्य आहेत, ज्यांना त्यांच्या भाषेचा मान आहे. मग महाराष्ट्रातील लोकं दुसऱ्या भाषेत बोलतात. आपल्याकडील मुलं-मुली इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये का बोलतात, असा सवालही राज ठाकरेंनी केला.

संपूर्ण हिंद प्रांतावर जे काही आक्रमणे झाली ते सर्व बाहेरून झाली आहेत. या हिंद प्रांतावर सव्वाशे राज्य मराठी माणसाने केलं. मग ज्यांनी राज्य केलं त्यांची भाषा जपली पाहिजे की दुसरी, असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. या मराठी भाषेसाठी आम्ही जे जे करू त्यालाही तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. आमच्यावर केसेस टाकू नका असं राज ठाकरे म्हणाले.

माणसांचे, भाषेचं, राष्ट्राचं जे अस्तित्व असतं, ते जमिनीवर असतं. आपण नेहमी आमचा इतिहास, जगाचा इतिहास असं म्हणतो, पण इतिहास म्हणजे काय, तर ते भुगोल. हिटलर असेल, नेपोलियन किंवा औरंगजेब असेल, जेव्हा ते एखाद्या प्रांत मिळवण्यासाठी तेथे आक्रमक करतात, तो प्रांत मिळवतात. तो मिळवल्यानंतर तो इतिहास होत असतो. हीच जमीन तुमच्या पायाखालून सरकली तेव्हा तुमचं अस्तित्व राहत नाही.त्यामुळे भुगोलाशिवाय इतिहास टिकू शकत नाही. आज आपण मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी मराठी साहित्य संमेलन करत आहे.

त्या मराठी माणसाचे अस्तित्व आपल्या शहरा शहरात टिकलं पाहिजे.ते राहिले आहे का? ते अस्तित्व आपण सर्वांनी आणि राज्य सरकारने टिकवलं पाहिजे.नुसतं प्रगतीच्या नावावर आपल्या जमिनी जात असतील, आणि आमचीच लोकं आमच्या राज्यात बेघर होत असतील तर त्याला विकास म्हणत नाही.आपलं अस्तित्व पूसण्याचा तो एक डाव असतो.त्यामुळे ही गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे. जर आपल्या भागाकडील पाच एकर जमीन एखाद्या कंपनीने विकत घेतली म्हणजे त्या जागेवरील पाच ते १० कुटुंबे बाहेर जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com