NCP leaders addressing the media in Pimpri-Chinchwad amid political tension over remarks against Deputy CM Ajit Pawar. saam tv
मुंबई/पुणे

...अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील काही निर्णय चुकले', महेश लांडगे प्रकरणावर माजी आमदारांचं मोठं वक्तव्य

Mahesh Landge Criticism On Ajit Pawar Reaction: पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांच्या टीकेनंतर अजित पवार गटाकडून सौम्य प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली.

Omkar Sonawane

भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय विषारी शब्दात टीका केल्यानंतर आता दोन दिवसांनी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महेश लांडगे यांना सौम्य शब्दात पप्रति उत्तर दिला आहे. अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार पिंपरी चिंचवड शहरात सकाळी दाखल झाल्या नंतर अजित पवार गटाकडून आता महेश लांडगे यांना अतिशय सौम्य शब्दात प्रतिउत्तर देण्यात येत आहे.

मी म्हणत होतो दादा याला उगाच मोठं करू नका. मात्र अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील काही निर्णय चुकले अशी खंत भोसरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली आहे. तर ज्यांना दादांनी आपल्या तालमीत घडवलं त्यांनी आज दादांवर अशा शब्दात टीका करायला नको हवी होती असं प्रतिउत्तर महेश लांडगे यांचे विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे यांनी दिलं आहे.

महेश लांडगे यांना सत्तेचा अहंकार आला आहे. अजित पवारांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे काढल्यानंतर, शहरात भाजपची सत्ता बदल होऊ शकते. त्यामुळे महेश लांडगे हे अजित पवारांवर अशाप्रकारे विषारी शब्दात आरोप करत आहेत. अतिशय विषारी शब्दात एकमेकांना प्रतिउत्तर देणे ही पिंपरी चिंचवड शहराची संस्कृती नाही म्हणून आम्ही अतिशय आक्रमक न होता सौम्य पद्धतीने महेश लांडगे यांना प्रतिउत्तर देत आहोत असं देखील अजित चव्हाण यांनी स्पष्ट केले.

भाजपचा आमदार महायुतीत जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एवढ्या विषारी शब्दात टीका करत असेल तर महायुतीत राहायचं की नाही याचा निर्णय सर्वस्वी दादा घेतील. असं देखील अजित गव्हाणे आणि विलास लांडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT