Shruti Vilas Kadam
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. रोज सकाळी तुळशीचे पाणी पिल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
तुळशीचे पाणी सर्दी, खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यास मदत करते. बदलत्या हवामानात हे विशेष फायदेशीर ठरते.
तुळशीचे पाणी पोटातील वायू, अपचन आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत करते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.
तुळशीचे पाणी मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळू शकते.
तुळशीमध्ये अॅडॅप्टोजेन गुणधर्म असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. नियमित सेवन केल्यास मन शांत राहते.
तुळशीचे पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते.
सकाळी उपाशीपोटी तुळशीचे पाणी पिल्यास शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स होते आणि ऊर्जा वाढते.