Agri Shala google
मुंबई/पुणे

Agri Shala: चल बाला,आता भरणार ‘आगरी शाला’; कुठे कशी जाणून घ्या सविस्तर माहिती

Agri Language: ठाण्यात आयोजित दोन दिवसांच्या 'आगरी शाळा' शिबिरात सहभागी व्हा. आगरी बोली आणि संस्कृतीचे जतन करणारा उपक्रम, ज्यामध्ये तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Saam Tv

मुंबई,ठाणे,रायगड,नाशिक,पालघर मधील स्थानिकांची बोली म्हणजे आगरी बोली. प्रसार माध्यमात तसेच विविध मालिकांमध्ये सर्रास वापरली जाणारी बोली तिच्या गोडव्यामुळे आपल्याला ठाऊक आहे. यंदाच मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पंरतु तिच्या बोलीभाषा अजुनही दुर्लक्षित आहेत.

तसेच ईंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे हल्ली आगरी बोलीचा वापर हा कमी होत चाल्ला असून परिणामी ही बोली बोलणारऱ्या वर्गाला ह्या भाषेचा विसर पडत चाल्ला आहेच. ह्यावर उपाय म्हणून ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे त्यांच्यासाठी भुमिपुत्र फाऊंडेशचे अध्यक्ष सुशांत पाटील आणि आगरी ग्रंथालय चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७,२८ मे रोजी ठाण्यात टाऊन हॉल येथे ‘आगरी शाला’ या २ दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरविले आहे.

आगरी ग्रंथालय चळवळीतील सर्वेश तरे,मोरेश्वर पाटील,दया नाईक,प्रकाश पाटील यांच्या मार्फत याआधीही आगरी बोली संवर्धनार्थ आगरी शाला,आगरी ग्रंथालय असे अनेक प्रयोग केले आहेत. आगरी शाला या उपक्रमात काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे. त्यात मराठी साहित्य मंडळाचे प्रा.एल बी पाटील,अग्रसेन मासिकाचे संपादक चंद्रकांत पाटील,हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे,आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील,सिनेअभिनेता मयुरेश कोटकर तसेच लोकगीतातील गीतकार संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या ‘आगरी शाला’ प्रयोगा अंतर्गत सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लघु पाठ्यक्रम असलेल पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्य चा समावेश असेल,याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी स्वत: केले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त आगरी भाषा प्रेमींनी मग ते कोणत्याही वयोगटातले असोत त्यांनी सहभाग घ्यावा असे युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी आवाहन केले असून इच्छूकांनी प्रवेशासाठी नोंदणीसाठी ९०९६७२०९९९/९८८११३३४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT