Navi Mumbai APMC Market Saam Tv
मुंबई/पुणे

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Navi Mumbai APMC Market: दिवाळीमध्ये ड्रायफ्रूट्स खरेदी करताना नागरिकांनो सावध राहा. कारण भेसळयुक्त ड्रायफ्रूट्स मार्केटमध्ये आले आहेत. नवी मुंंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये ड्रायफ्रूट्समध्ये भेसळ करतानाचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.

Priya More

Summary -

  • नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये भेसळयुक्त ड्रायफ्रूट्सची विक्री

  • काजू, बदाम आणि मनुक्यांना रासायनिक द्रावणाने प्रक्रिया केली जात असल्याचे धक्कादायक व्हिडीओ समोर

  • अन्नसुरक्षेच्या नियमांचा भंग करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू

  • अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भेसळखोरीचा गोरखधंदा फोफावला असल्याची चर्चा

विकास मिरगणे, नवी मुंबई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवी मुंबईतील APMC मसाला मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट्सचा पुरवठा होत असताना या मागणीचा फायदा घेत काही भेसळखोरांनी बाजारपेठेत मोठा गोरखधंदा सुरू केल्याचे उघड झाले आहे. या मार्केटमधील G, H, L विंग मधील गाळ्यावर अनधिकृतपणे बदाम आणि ड्रायफ्रूट्स मध्ये भेसळ करून आत आणि बाहेर विक्री केला जातेय. प्रत्यक्ष दृश्यांचे व्हिडिओ आता समोर आले असून त्यातून भेसळीचे थरारक चित्र दिसत आहे.

या व्हिडिओंमध्ये मनुक्याला रासायनिक द्रावणाने धुतले जात असल्याचे आणि त्यावर रंग आणि पावडर टाकून चमकदार बनविण्याची प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट दिसते. हिच वस्तू पुढे प्रोसेसिंग करून फ्लेवरमध्ये निघतात आणि आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात विक्रीसाठी ठेवली जाते. दुसऱ्या व्हिडिओत काजू आणि बदामाचे प्रोसेसिंगही अशाच प्रकारे होत असल्याचे दिसून आले. काजू कशाप्रकारे खाली पडलेले आहेत. ते ट्रेमध्ये टाकून फ्लेवर साठी भट्टीमध्ये ठेवले जात आहेत. तर बदामसुद्धा कशाच प्रकारे प्रोसेसिंग केले जातात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

जमिनीवर उघड्यावर ही सर्व प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा तसूभरही विचार न करता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ चालला असल्याचे स्पष्ट होत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भेसळ कारभारामागे बाजार समितीचे सभापती, संचालक,सचिव आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय फोफावला आहे. अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे जाणूनबुजून कारवाई टाळली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

सध्या ड्रायफ्रुट्सचे दर ५०० ते २२०० रुपये किलोपर्यंत असून फ्लेवर आणि पॅक केलेले ड्रायफ्रुट्स त्याहून महाग विकले जात आहेत. परंतु या आकर्षक पॅकिंगच्या आड नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू आहे. दिवाळीच्या खरेदीत मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्सला पसंती देणाऱ्या ग्राहकांना यामागील वास्तवाची माहिती नसल्यामुळे आता भेसळखोरांची दिवाळी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे भाग्य फुलून येईल

Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बँग

Maharashtra Live News Update: "पोरावरची केस मागे घे आणि ५ लाख दे..." निलेश घायवळची धमकी,गुन्हा दाखल

Suranache Kaap: जेवणासोबत तोंडी लावायला बनवा सुरणाचे कुरकुरीत काप, ५ मिनिटांत होतील तयार

Ind vs SA Test : भारतावर पराभवाचं सावट; 'शेर' का होताहेत ढेर? 'गंभीर' कारणं

SCROLL FOR NEXT