Mumbai APMC Market : मुंबई एपीएमसीत तीन दिवसापासून भाजीपाला पडून; मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी, व्यापारी अडचणीत

Navi Mumbai : राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे वाशीतील भाजीपाला मार्केटमध्ये मालाची आवक कमी झाली
Mumbai APMC Market
Mumbai APMC MarketSaam tv
Published On

विकास मिरगणे

नवी मुंबई : राज्यात मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भाजीपाल्याला फटका बसला असून मुंबई एपीएमसीत भाज्यांची आवक घटली आहे. मार्केटमध्ये आलेल्या मालाला उठाव नसल्याने मागील तीन दिवसांपासून विक्रीसाठी आलेला भाजीपाला पडून आहे. परिणामी शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत सापडले असून यात माल खराब होऊन फेकला जात असल्याचे यात आर्थिक नुकसान होत आहे. 

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे वाशीतील भाजीपाला मार्केटमध्ये मालाची आवक कमी झाली असून, भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनाही रेलचेल कमी झाली आहे. परिणामी शिल्लक भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात ४४९ गाड्यांची आवक झाली असली तरी खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याची स्थिती आहे. 

Mumbai APMC Market
Amravati Airport : उड्डाणापूर्वी घडले अजबच; पेट्रोल न मिळाल्याने अमरावती मुंबई विमान फेरी रद्द, प्रवासी संतप्त

पालेभाज्यांचे दर ४० टक्क्यांनी झाले कमी 

चांगल्या प्रतीचा माल चढ्या दराने विकला जात असला तरी या शेतात बराचसा माल भिजल्याने खराब झाला आहे. अशा भाजीपाल्याच्या दरांवर परिणाम झाला असून अनेक भाज्यांचे दर झपाट्याने कमी झाले आहेत. विशेषतः पालेभाज्या शेतातूनच भिजून आल्याने बाजारात येईपर्यंत खराब झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे शेतात पिकांचे नुकसान झाले असून, याचा परिणाम थेट बाजारात जाणवतो आहे.

Mumbai APMC Market
Pune Rain : ६३ वर्षानंतर पहिल्यांदा १५ दिवस आधी पुण्यात मॉन्सून दाखल; तीन आठवड्यांपासून सुरु आहे मान्सूनपूर्व पाऊस

दर आणखी खाली येण्याची शक्यता 

गिऱ्हाईकाने पाठ फिरवल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भाजीपाला पडून आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतला माल बाहेर फेकून देण्याची वेळ आली आहे. तर येणाऱ्या काही दिवसांतही दर तळाला येण्याची शक्यता कमी असून, दरवाढ कायम राहू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. पावसामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा फटका सामान्य ग्राहकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच बसला आहे.

सध्या बाजारात असलेले भाजीपाला दर
- फ्लॉवर : १६ ते २२ रुपये किलो
- टोमॅटो : १६ ते २४ रुपये किलो
- वाटाणा : ९० ते ११० रुपये किलो
- फरसबी : ६० ते ९० रुपये किलो
- गवार ३० ते ६० रुपये किलो
- भेंडी ३४ ते ४० रुपये किलो
- शेवग्याच्या शेंगा : २० ते ६० रुपये किलो
- कोथिंबीर : ८ ते १० रुपये जुडी
- पालक : ८ ते १० रुपये जुडी
- मेथी : ८ ते १० रुपये जुडी
- कांदा पात : ८ ते १० रुपये जुडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com