Pune Rain : ६३ वर्षानंतर पहिल्यांदा १५ दिवस आधी पुण्यात मॉन्सून दाखल; तीन आठवड्यांपासून सुरु आहे मान्सूनपूर्व पाऊस

Pune News : राज्यात तळकोकणात ३५ वर्षांनंतर सरासरी वेळेपूर्वी दाखल. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असून पुढील ४ ते ५ दिवसात राज्याच्या अन्य भागातही तो हजेरी लावेल; अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
Pune Rain
Pune RainSaam tv
Published On

अक्षय बडवे 

पुणे : राज्यात दरवर्षी जूनमध्ये दाखल होणार मॉन्सून यंदा पंधरा दिवस आधीच म्हणजे मे महिन्यातच दाखल होत आहे. राज्यातील काही भागात मान्सूनला सुरवात झाली असून पुण्यात देखील २६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. दरम्यान मागील ६३ वर्षानंतर म्हणजेच १९६२ या वर्षानंतर पुण्यात प्रथमच मॉन्सून दाखल झाला आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यात यंदा संपूर्ण मे महिना अवकाळी पाऊस सुरु आहे. कधी झाला नाही इतका अवकाळी पाऊस मे महिन्यात पडत असल्याने उन्हाळ्यातच अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच मॉन्सूनचे आगमन देखील यंदा लवकर होत आहे. यामुळे यंदा तीव्र स्वरूपाचा असा उन्हाळा जाणवून आला नाही. मात्र अवकाळी पावसामुळे सर्वत्र नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. तर आता राज्यात मान्सून दाखल झाल्याचे सुखावह चित्र पाहण्यास मिळत आहे. 

Pune Rain
Amravati Airport : उड्डाणापूर्वी घडले अजबच; पेट्रोल न मिळाल्याने अमरावती मुंबई विमान फेरी रद्द, प्रवासी संतप्त

६३ वर्षांपूर्वी २९ मेस आला होता मॉन्सून   
राज्यात तळकोकणात ३५ वर्षांनंतर सरासरी वेळेपूर्वी दाखल झालेल्या मॉन्सूनने पुण्यात सुद्धा नवीन विक्रम केला आहे. पुण्यात मॉन्सून यापूर्वी १९६२ मध्ये २९ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर यंदाचा मॉन्सून २६ मे रोजी पुण्यात दाखल झाला. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असून पुढील ४ ते ५ दिवसात राज्याच्या अन्य भागातही तो हजेरी लावेल; अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Pune Rain
MP Vishal Patil : अलमट्टीमुळे पूर येत नसल्याचे सरकारने मान्य करावे; खासदार विशाल पाटील यांचा राज्य सरकारवर निशाणा

गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली होती.अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण होतं. यानंतर पुण्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मॉन्सूनच्या आगमनामुळे पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

गेल्या १० वर्षात मॉन्सूनचे पुण्यातील आगमन (वर्ष आणि तारीख)
२०१५: १२ जून
२०१६: २० जून
२०१७: १२ जून
२०१८: ९ जून
२०१९: २४ जून
२०२०: १४ जून
२०२१: ६ जून
२०२२: ११ जून
२०२३: २४ जून
२०२४: ९ जून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com