MP Vishal Patil : अलमट्टीमुळे पूर येत नसल्याचे सरकारने मान्य करावे; खासदार विशाल पाटील यांचा राज्य सरकारवर निशाणा

Sangli News : अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. याला विरोध केला जात आहे
MP Vishal Patil
MP Vishal PatilSaam tv
Published On

सांगली : अलमट्टीमुळे पूर येत नसेल, तर राज्य सरकारने महापुराला आपण जबाबदार असल्याचे मान्य करावे. पुरावे माझ्याकडे द्यावेत मी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारशी चर्चा करायला तयार असल्याचे मत व्यक्त करत खासदार विशाल पाटील यांनी सरकारला एकप्रकारे आवाहन केले आहे. 

अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. याला विरोध केला जात आहे. मात्र महाराष्ट्र शासनाकडून ठोस कायदेशीर पावले उचलली जात नाही. यावर खासदार विशाल पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

MP Vishal Patil
Crime News: बायको अन् बॉयफ्रेंडचा बेडवर रोमान्स, नवऱ्यानं रंगेहाथ पकडलं; संतापून पत्नीनं तलवारीनं पतीला संपवलं

राज्य सरकारची तक्रारच नाही 

अलमट्टीबाबत राज्य सरकार किंवा तत्सम कोणत्याही विभागाकडून तक्रार किंवा उंचीबाबत आक्षेप नोंदवले नाही. त्यामुळे अलमट्टीमुळे महापूर येतो, असे राज्य सरकारचे मत नसावे अशी टिप्पणी ही खासदार विशाल पाटील यांनी केली. महाराष्ट्र सरकारची तक्रारच नसल्यामुळे कर्नाटक सरकारकडून अलमट्टी उंचीबाबत वक्तव्य केली जात असून याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. असा आरोपही खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. 

MP Vishal Patil
Amravati Airport : उड्डाणापूर्वी घडले अजबच; पेट्रोल न मिळाल्याने अमरावती मुंबई विमान फेरी रद्द, प्रवासी संतप्त

तर केंद्र व कर्नाटक सरकारसोबत चर्चा करायला तयार 

कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान अलमट्टी धरणामुळेच महापूर येत नसेल; असं जर राज्य सरकारचे मत आहे. तर याबाबतचे पुरावे माझ्याकडे द्यावेत. मी स्वतः केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारशी चर्चा करायला तयार आहे, असे मतही विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com