Silver Rate: चांदीच्या किंमती ३ लाखांचा पल्ला गाठणार, दिवाळीच्या सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?

Silver Investment: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या मागणीमुळे चांदीचा दर पाहूणे तीन लाखांचा पल्ला गाठू शकतो.
Silver Rate
Diwali Gold & Silver Rushgoogle
Published On

दिवाळीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी केली जाते. यंदाच्या दिवाळीत मात्र ग्राहकांना ही खरेदी करताना चांगलाच फटका बसणार आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडताना पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या किमतींनी १ लाख ३१ हजारांचा टप्पा पार केला आहे. त्याचसोबत आता चांदीही आता वाढताना पाहायला मिळते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चांदीच्या किंमती आता पाहूणे तीन लाखांचा टप्पा गाठला आहे.

भारतात चांदी खरेदीच्या मागण्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात चांदीची टंचाई निर्माण झाली आहे. याचं कारण फक्त दिवाळी नसून केंद्रीय बॅंका आणि सरकार असणार आहे. शिवाय भविष्यातल्या किमती सुरक्षित करण्यासाठी उद्योग आगाऊ बुकिंग करत आहे. म्हणून चांदीचे भाव गगनाला भिडताना दिसत आहेत. असे पर्पल ज्वेलर्सचे नितेश जैन म्हणाले.

Silver Rate
Mumbai Diwali Shopping: दिवाळीसाठी पणत्या फक्त 30 रुपये डझनात; शॉपिंगसाठी मुंबईतील प्रसिद्ध मार्केट्स कोणते?

पुढे जैन म्हणाले की, चांदीच्या किमती सध्याच्या किमतीपेक्षा अंदाजे २३ टक्के वाढू शकतात. त्याप्रमाणे चांदीच्या किंमती लवकरच ६५ डॉलर ते ७० डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात मात्र चांदीची आयात कमी झाली असल्याने ग्राहकांना त्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र त्वरीत डिलीवरी हवी असल्यास १५,००० ते २०,००० इतका प्रिमियम द्यावा लागेल.

मुंबईत १० ग्रॅम चांदीची किंमत सुमारे १,२६१ आहे.

देशात चांदीची किंमत सुमारे १,९०,००० प्रति किलोग्रॅम आहे.

चांदीची प्रति किलोची किंमत १,८५,००० च्या आसपास असणार आहे.

अनेक विश्लेषकांचा अंदाज आहे की चांदीची किंमत पुढील काही दिवसात १,६०,००० ते २,००,००० प्रति किलो होण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओस्वालने असा अंदाज लावला आहे की २०२६ पर्यंत चांदीची किंमत २,४०,००० प्रति किलो होण्याची शक्यता आहे. पण या अंदाजांमध्ये आपण जागतिक बाजार, मागणी-पुरवठा, चलनवाढ हे सर्व घटक महत्वाचे ठरतील.

Silver Rate
Google AI Hub: गुगलची भारतात सगळ्यात मोठी गुंतवणूक; तब्बल होणार 1,331,879,040,000 रुपयांचं AI हब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com