Google AI Hub: गुगलची भारतात सगळ्यात मोठी गुंतवणूक; तब्बल होणार 1,331,879,040,000 रुपयांचं AI हब

PM Modi AI Vision: गुगल भारतात तब्बल १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. विशाखापट्टणम येथे देशातील सर्वात मोठा एआय हब उभारला जाणार असून, अदानी ग्रुपसोबतची भागीदारी तंत्रज्ञान विकासाला चालना देईल.
Google AI Hub
PM Modi AI visiongoogle
Published On

गुगलचे CEO सुंदर पिचाई मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत भारतातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. गुगल आता आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टनम शहरात एक मोठा Artificial Intelligence हब बनवणार आहे. गुगलचा सर्वात मोठा एआय हब असेल. कंपनीने पुढील पाच वर्षांत भारतात १५ अब्ज डॉलर्स सुमारे १.२५ लाख कोटी गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे.

अदानी ग्रूपसोबत भागीदारी

गुगलने या प्रोजेक्टसाठी अदानी ग्रूपसोबत भागीदारी केली आहे . आता दोन्ही कंपन्या एकत्र येऊन एक भव्य डेटा सेंटर तयार करतील. तसेच एआय बेस तयार करणार आहेत. ज्यामध्ये भारताचे आणि जगाचे आर्टीफिशिअल इंटेलिजेंसवर काम होईल. हे केंद्र फक्त तंत्रज्ञानातच नाही, तर ऊर्जा आणि डेटा पायाभूत सुविधांच्या बाबतीतही उपयुक्त ठरणार आहे. सुंदर पिचाई यांनी याला "Landmark Development" असल्याचे सांगितले. त्यात गिगावॅट-स्केल कंप्यूटिंग क्षमता, एक नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे आणि मोठ्या प्रमाणात एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश असेल.

Google AI Hub
Mumbai Real Estate : घरांच्या विक्रीत मुंबई नंबर १, वाढत्या किंमतींनंतरही विक्रीचा आलेख चढता

भारतातील AI इनोव्हेशनला मोठी चालना मिळणार

सुंदर पिचाई म्हणाले की, या हबच्या साहाय्याने, गुगल त्यांचे industry-leading एआय टूल्स आणि तंत्रज्ञान भारतात येणार आहे. ज्यामुळे देशात एआय-आधारित इनोव्हेशन आणि डिजिटल विकासाला एक नवीन चालना मिळेल. त्यांनी ट्विटरवर पोस्टवर सांगितले की, "आम्ही भारतातील आमच्या युजर्ससाठी आणि उद्योगांसाठी एआय इनोव्हेशनला गती देऊ आणि देशात विकास घडवून आणू."

पंतप्रधान मोदींनी एक मोठी गोष्ट सांगितली

पंतप्रधान मोदींनीही या प्रकल्पाचे स्वागत केले आणि लिहिले की, "विशाखापट्टणमसारख्या dynamic शहरात गुगल एआय हब सुरू झाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे." त्यांनी सांगितले की, ही गुंतवणूक भारताच्या 'विकसित भारत २०४७' च्या दृष्टिकोनातून केली आहे. देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा देण्यात आली आहे. हा प्रोजेक्ट AI For All चे उद्दिष्ठ पूर्ण करणारा असणार आहे.

Google AI Hub
Death Symptoms: मृत्यूपूर्वी २४ तासांत दिसणारी तीन लक्षणं; डॉक्टरांनी सांगितला भावनिक अनुभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com