Death Symptoms: मृत्यूपूर्वी २४ तासांत दिसणारी तीन लक्षणं; डॉक्टरांनी सांगितला भावनिक अनुभव

End Of Life: मृत्यूपूर्व २४ तासांत दिसणारी काही खास लक्षणं डॉक्टरांनी उघड केली आहेत. ही लक्षणं जाणून घेतल्याने मृत्यूविषयीची भीती कमी होऊन आयुष्याकडे शांततेने पाहता येते.
Death Symptoms: मृत्यूपूर्वी २४ तासांत दिसणारी तीन लक्षणं; डॉक्टरांनी सांगितला भावनिक अनुभव
Published On
Summary

माणसाला मृत्युपूर्वी सगळ्यात जास्त पुढील ३ गोष्टीची भिती असते.

काही लक्षणांमुळे मृत्यूविषयीची भीती कमी होऊन शांतता जाणवते.

मृत्यू हा शेवट नसून शांततेचा अनुभव आहे, असं त्या सांगतात.

प्रत्येकाला माहितच आहे की, माणून जन्म घेतो जीवन जगतो आणि याचा शेवट मृत्यूने होतो. मृत्यू ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अटळ गोष्ट आहे, मात्र त्याबद्दल बोलणं अनेकांना अस्वस्थ करणारं वाटतं. मरण्याची भीती, प्रिय व्यक्ती गमावण्याचे टेन्शन आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठीचे प्रयत्न या सगळ्याभोवती एक प्रचंड उद्योग निर्माण झाला आहे. परंतु एका हॉस्पिस नर्सने मृत्यूपूर्वी दिसणारी काही लक्षणं उघड केली आहेत आणि ती लोकांना मृत्यूविषयीची भीती कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

अमेरिकेतील हॉस्पिस नर्स जुली मॅकफॅडन या १६ वर्षांपासून मृत्युपूर्व भिती वाटत असणाऱ्या रुग्णांशी संवाद साधण्याचे काम करत आहेत. त्यांनी ‘Nothing to Fear: Demystifying Death to Live More Fully’ हे पुस्तक लिहून मृत्यूविषयीची भिती काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नर्स जुली सांगतात की, मृत्यूच्या अगोदर साधारण २४ तासांत तीन गोष्टी मोठ्या प्रमाणात जाणवतात. जी त्या व्यक्तीला अस्वस्थ करुन टाकतात.

पहिली म्हणजे व्यक्तीचा श्वास आणि आवाज बदलायला लागतो. दुसरी म्हणजे ती व्यक्ती वारंवार आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत बोलते, त्यांच्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करते आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो रुग्ण केलेल्या चुकांची क्षमा वागतो, किंवा इतरांना माफ करुन मन मोकळं करतो.

त्यांच्या मते, मृत्यूच्या आधी लोकांमध्ये भीतीपेक्षा एक शांततेची भावना जाणवायला लागते. ती माणसं आयुष्याबद्दल समाधान व्यक्त करतात, कुटुंबियांना मला माफ करा, मी तुमचा आभारी आहे किंवा माझं तुमच्यावर प्रेम आहे अशी भावना व्यक्त करतात.

Death Symptoms: मृत्यूपूर्वी २४ तासांत दिसणारी तीन लक्षणं; डॉक्टरांनी सांगितला भावनिक अनुभव
Milk Tips: दुधासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नयेत?

संशोधनानुसार, मृत्यूची जाणीव ही मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी बनवते. १० टक्क्यांपर्यंत लोकांना मृत्यूची भीती म्हणजेच 'डेथ अँझायटी' जाणवते. विवाहस्थिती, वय, आरोग्य आणि जीवनाचा अर्थ या घटकांमुळे ही भीती वाढू किंवा कमी होऊ शकते.

पॅलियेटिव्ह नर्स या मृत्यूच्या आधीच्या काळात रुग्णांच्या भीतीवर काम करतात, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देतात. सोशल मीडियावर नर्स जुली या नावाने प्रसिद्ध असलेल्या मॅकफॅडन यांच्या व्हिडिओंना लाखो लोक पाहतात. त्या व्हिडिओमध्ये त्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणांचे मानवी पैलू दाखवतात प्रेम, कृतज्ञता आणि क्षमा. याप्रकारे माणसाला मृत्युपुर्वी लक्षणे जाणवू लागतात.

Q

मृत्यूच्या २४ तास आधी कोणती लक्षणं दिसतात?

A

श्वासात बदल होतो, व्यक्ती भावनिक होते, आणि प्रियजनांविषयी प्रेम व्यक्त करते.

Q

ही लक्षणं का महत्त्वाची आहेत?

A

मृत्यूच्या भीतीऐवजी शांततेकडे नेणारी प्रक्रिया दाखवतात.

Q

नर्स जुली मॅकफॅडन कोण आहेत?

A

अमेरिकेतील हॉस्पिस नर्स असून, १६ वर्षांपासून मृत्यूपूर्व काळात रुग्णांसोबत काम करत आहेत.

Q

मृत्यूविषयी बोलणं का आवश्यक आहे?

A

कारण मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याची भीती दूर झाली तर आपण आयुष्य अधिक अर्थपूर्ण जगू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com