Sakshi Sunil Jadhav
दूध हा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी काही पदार्थांसोबत त्याचा सेवन टाळणे गरजेचे आहे. कारण काही पदार्थ दूधासोबत घेतल्यास पचनाच्या समस्यांपासून ते शरीरात अॅलर्जीपर्यंत त्रास होऊ शकतात.
आंबट फळे जसे संत्री, लिंबू ही दूधासोबत घेतल्यास अपचन पोटात गॅसची समस्या होऊ शकते.
दूधासोबत गरम पेये पचनावर घातक परिणाम करतात आणि पोटात त्रास सुरु होतो.
दूधासोबत केळी खाल्यास पचनशक्ती कमजोर होऊ शकते आणि गॅस तयार होते.
मसालेदार पदार्थ दूधासोबत घेतल्यास शरीरात जळजळ आणि पचनाचा त्रास होऊ शकतो.
प्रथिनेयुक्त पदार्थ दूधासोबत घेतल्यास पचन जड होते. हे पदार्थ लगेचच पचत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जुलाब सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
दूधासोबत द्राक्षे घेतल्यास पोटात गॅस आणि जडपणा येऊ शकतो. त्यामुळे फळांचा आहार दूधासोबत घेणं टाळा.
दूधासोबत दही टाळा. त्याने पचनात अडथळा येतो आणि पोटास गॅस तयार होते.