Abhishek Ghosalkar Death Case Saamtv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar Case: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना झापले

Priya More

सचिन गाड, मुंबई

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास सीबीायकडे वर्ग करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टात अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने केलेली याचिका कोर्टाने स्वीकारली. यावर सुनावणी करताना हायकोर्टाने मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला.

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडेबोल सुनावले. मुंबई पोलिसांनी तपासात दाखवलेल्या त्रुटी दखलपात्र अससल्याचे मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण आहे. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे.

राजकीय दबावामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास योग्य पद्धतीनं केला नसल्याचा आरोप तेजस्वीनी घोसाळकर यांनी केलेल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे आता याप्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे.

तेजस्वी घासाळकर यांनी याचिकेमध्ये अनेक गंभीर दावे केले आहे. अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी- सूत्रधारांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळे सूत्रधार मोकाट आहेत. असे असताना देखील पोलिसांनी घाईघाईमध्ये आरोपपत्र दाखल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT