Abhijit Bichukale Baramati  Saam
मुंबई/पुणे

Abhijit Bichukale: झोळी रिकामीच! बारामती पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना नोटांपेक्षा कमी मते

Baramati By Poll Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी झाल्या. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले याचा पराभव झाला. त्याला नोटांपेक्षआ कमी मते मिळाली.

Priya More

Summary:

  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी

  • बिग बॉस फेम अभिजीत बिचकुलेंचा पराभव

  • नोटांपेक्षाही त्यांना कमी मतं मिळाली

अक्षय बडवे, पुणे

निवडणुक कुठली ही असो चर्चा असते ती म्हणजे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांची. अगदी राष्ट्रपती निवडीपासून ते नगर पालिकेच्या निवडणुकीपर्यंत जेव्हा जेव्हा निवडणुकांचा विषय येतो तेव्हा तेव्हा बिचुकले हे प्रत्येक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरून आत्मविश्वासात ती लढतात. नुकत्याच पार पडलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुद्धा साताऱ्याच्या बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर शड्डू ठोकला.

राज्यात कोणती ही निवडणूक लढण्याचं बिचुकले संधी सोडत नाहीत मग ती लोकसभा असो की विधानसभा किंवा कुठली पोटनिवडणूक, ते मैदानात उतरणार म्हणजे उतरणार. समोरचा उमेदवार कितीही तुल्यबळ असो बिचुकले यांनी नेहमीच त्यांच्या कृतीने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी ही असंच घडलं. त्यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नशिब अजमावून पाहीले पण हार पत्करावी लागली.

राज्यात बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीची मतमोजणी संपन्न झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. बारामतीची निवडणुकीचा निकाल हा फक्त औपचारिकता मानला जात होता, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी देशात सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवत एक नवीन विक्रम केला.

याच बारामती मतदारसंघात बिचुकले यांनी देखील अर्ज दाखल केला होता मात्र त्यांची अवस्था इतर निवडणुकीप्रमाणे झाली. मतमोजणीच्या एकूण २४ फेरींमध्ये बिचुकले यांना ३३२ मतं मिळाली आहे. याचाच अर्थ २ लाख १७ हजार ६६८ मतांनी त्यांचा पराभव झाला. इतका दारुण पराभवानंतर सुद्धा अभिजीत बिचुकले यांचा विश्वास कुठे ही डगमगलेला नाही कारण एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी "२०२९ मध्ये राज्याचा मुख्यमंत्री मी म्हणेल तोच होणार, माझ्याशिवाय तो मुख्यमंत्रीच होणार नाही', असे सांगितले.

अभिजित बिचुकले यांनी लढविलेल्या निवडणुका आणि त्यात मिळालेली मतं -

२०२६ बारामती विधानसभा पोटनिवडणूक: ३३२

२०२५ सातारा नगरपालिका निवडणूक: २ हजार ७७२

२०२४ बारामती विधानसभा निवडणूक: ६८

२०२४ सातारा विधानसभा निवडणूक: ५२९

२०२३ कसबा विधानसभा पोटनिवडणूक: ४

२०२१ पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: ६६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपूर सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

४७ आमदारांचा राजकीय पक्ष फुटला; 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात मोठी खळबळ

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

LPG e-KYC Deadline: 30 जूनपर्यंत हे काम उरकून घ्या, अन्यथा सिलेंडर आणि सबसिडीही मिळणार नाही

SCROLL FOR NEXT