MIDNIGHT CALL FROM AADITYA THACKERAY TO CM FADNAVIS STALLS SHINDE GROUP’S BMC PLAN Aaditya Thackeray Call to CM :
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोन; नंतर फडणवीसांनी बीएमसीमधील शिंदे गटाच्या प्लॅनला लावला ब्रेक

Aaditya Thackeray Call to CM : मुंबईतील मोक्याच्या जमिनी आणि महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत घेतल्या जाणाऱ्या चार मोठ्या निर्णयांना तात्पुरता ब्रेक लागला आहे. हा निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीवरून मध्यरात्री फोन गेल्याची माहिती समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला.

  • त्यानंतर बीएमसीतील चार महत्त्वाच्या निर्णयांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

  • शिंदे गट मुंबईतील जमिनींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न

मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना फोन गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी महापालिकेत घेतल्या जाणाऱ्या चार मोठ्या निर्णयांना तुर्तास ब्रेक लागला आहे. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या दोन भूखंडांचे हस्तांतरण, सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देणे आणि पाच उपनगरीय रुग्णालयांतील रक्तपेढय़ांच्या खासगीकरणाचे प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली आहे.

हा निर्णय घेण्यासाठी मातोश्रीवरून मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना फोन गेला होता. हा फोन आदित्य ठाकरे यांनी केला होता. परंतु मध्यरात्री घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणात एका नव्या समीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की, शिंदे गट मुंबईच्या मुख्य जागांवरील जमिनींवर ताबा करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (बीएमसी) राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण लागले आहे, हे राजकीय बदलाकडे निर्देश करत आहे.

मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर टीका केली. शिंदे गटाकडून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी लाटण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेच्या सुधारणा समितीमध्ये सध्या शिंदे गटाचे वर्चस्व आहे. विपुल दोशी या समितीच्या अध्यक्ष आहेत. ही समिती मुंबईतील मोठे बांधकाम प्रकल्प, रस्त्यांची सुधारणा आणि पायाभूत सुविधांना मंजुरी देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते.

ठाकरे-फडणवीस युतीच्या चर्चांना उधाण, पडद्यामागे घडतंय काय?

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर दोषारोप केला. पण त्यानंतर मध्यरात्री घडलेले महानाट्य अनेकांच्या भुवया उंचावल्या. रात्री उशिरा मातोश्रीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक फोन करण्यात आला. त्यानंतर घटनांना वेग आला. आदित्य ठाकरे यांनी आपले विश्वासू शिवसेनेचे यूबीटी विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांना फडणवीसांकडे पाठवलं.

त्यांनी बीएमसीच्या प्रस्तावांमधील विसंगतींबद्दल फडणवीस यांना माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री हा निर्णय घेतला. याबाबत नार्वेकर म्हणाले की, फडणवीस यांनी या प्रकल्पांसंदर्भात भाजप नगरसेवकांकडून तात्काळ सविस्तर अहवाल मागवला. त्यानंतर हे चार प्रस्ताव त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काचेच्या बांगड्याची फॅशन जुनी झाली, यंदा वटपौर्णिमेला खरेदी करा 'या' ५ नवीन डिझाईन्सच्या हिरव्या बांगड्या

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदेंना बेदम मारहाण, बायकोचे हातपाय तोडून विहिरीत फेकण्याची धमकी, आरोपीत प्रसिद्ध रील स्टारचा समावेश

Maharashtra News Live Update: सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

Political News: मोठी बातमी! TMC, शिवसेनेनंतर देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटणार, कॅबिनेट मंत्र्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्या कारणामुळे फुटीर झाले? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT