Yuvraj Sambhajiraje Chhatrapati  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा समाजाला न्याय मिळवून देणार; २६ फेब्रुवारीपासून आमरण उपाेषण : संभाजीराजे छत्रपती

आज राजेंनी आंदाेलनाची पुढची दिशा स्पष्ट केली.

Siddharth Latkar

मुंबई : मराठा आरक्षण व समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून आमरण उपाेषण करणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. हे आंदाेलन आझाद मैदानावर असेल असे राजेंनी नमूद केले. (maratha reservation latest marathi news)

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविलेली आहे असे युवराज संभाजीराजेंनी स्पष्ट केले. संभाजीराजे महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकारवर प्रचंड नाराज झाल्याचे आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा जाणवले.

संभाजीराजे (sambhajiraje) म्हणाले मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) आंदोलन केली. सर्व पक्षातील नेत्यांना भेटलाे. परंतु समाजासाठीच्या मांडत असलेल्या मागण्या पूर्ण हाेत नाहीत हे लक्षात आलं आहे. आजपर्यंत आम्ही आक्रमकरित्या आंदाेलनं केली परंतु आता मी स्वतः उद्विग्न झालो आहे अशी खंतही खासदार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली.

संभाजीराजे म्हणाले, ''केवळ ५ ते ६ मागण्या आहेत. त्या अद्याप मान्य होत नाहीत. महाराष्ट्र सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे येत्या २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणास आझाद मैदानात बसणार आहे. मला समन्यवकांनी सांगितलं राजे टाेकाची भुमिका घेऊ नका. परंतु मी त्यांना समजावलं आहे. समाजासाठी जे काही करावं लागेल ती मी करणार आहे. मी एकटाच या आंदाेलनास बसणार असल्याचे संभाजीराजेंनी नमूद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT