Goa Polls 2022 : मतदानासाठी गाेयंचे नागरिक माेठ्या संख्येने घरा बाहेर पडतील : राज्यपाल पिल्लई

आज सकाळपासून गाेव्यात उत्साहात मतदानास प्रारंभ झाला आहे.
Goa Governor PS Sreedharan Pillai
Goa Governor PS Sreedharan PillaiSaam Tv
Published On

- रश्मी पुराणीक

गाेवा : गोव्यातील (goa) नागरिकांचे कायम प्रशासनास सहकार्य लाभले आहे. येथील जास्ती जास्त मतदार घराबाहेर पडतील आणि मतदान करतील असा मला ठाम विश्वास आहे असल्याची भावना गोव्याचे (goa) राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केली. पिल्लई यांनी त्यांच्या पत्नीसह आज (साेमवार) गाेवा विधानसभा (goa assembly election) निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पिल्लई बाेलत हाेते. (goa assembly election 2022 latest marathi news)

पिल्लई म्हणाले गाेव्यात (goa election 2022) कोणतेही मोठे राजकीय (political) संघर्ष नाहीत. निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील. भारत निवडणुक आयाेग (ECI) आणि सर्व राजकीय पक्ष कौतुकास पात्र आहेत. यावर्षी माेठ्या प्रमाणात मतदान हाेईल अशी मला आशा आहे असे ही पिल्लई यांनी नमूद केले.

Goa Governor PS Sreedharan Pillai
Goa Polls 2022 : गाेव्यात मतदानासाठी ज्येष्ठांसह युवकांच्या रांगा, राज्यपालांनी बजावला पत्नीसह हक्क

गाेव्यात व्हॅलेंटाईन डे दिवशी निवडणुक आल्याने त्या अनुषंगाने काही भागात तसेच काही मतदान केंद्रांवर सेल्फी पाॅईंट (selfie point) उभारण्यात आले आहेत. मतदान (Goa Polls 2022) झाल्यावर व मतदानापुर्वी येथे मतदार त्यांचा सेल्फी घेऊन शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com