Goa Polls 2022 : गाेव्यात मतदानासाठी ज्येष्ठांसह युवकांच्या रांगा, राज्यपालांनी बजावला पत्नीसह हक्क

आज सुमारे ११ लाख मतदार मतदानाचे हक्क बजावणार आहात.
voters in queue for goa assembly election 2022
voters in queue for goa assembly election 2022Saam Tv

- रश्मी पुराणीक

गाेवा : गाेवा (goa) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (assembly election) आज (साेमवार) सकाळपासून मतदानास उत्साहात प्रारंभ झाला आहे. या राज्यात ४० जागांसाठी मतदान हाेत आहे. सकाळी सात वाजल्याच्या आधीपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर आपला हक्क बजावण्यासाठी रांगेत उभं राहण्यास प्रारंभ केला. (goa assembly election latest updates)

पर्वरी (goa) मतदारसंघातील आराडी-सुकूर इथल्या मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळी ७ वाजण्यापूर्वीच रांगा लावल्या हाेत्या. सर्वच मतदान केंद्रावर काेविड १९ (covid19) च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे.

Goa governor casting his vote
Goa governor casting his votesaam tv
goa governor along with wife after casting vote in goa assembly election
goa governor along with wife after casting vote in goa assembly electionsaam tv

गोव्याचे राज्यपाल यांनी पत्नी बरोबर जाऊन आपला मतदानाचा (voting) हक्क बजावला.

बहुतांश मतदान केंद्रावर सजावट करण्यात आली आहे. मतदान केल्यानंतर नागरिकांना सेल्फी काढता यावा यासाठी निवडक केंद्रांवर सेल्फी पाॅईंट उभारण्यात आले आहेत. सुमारे ११ लाख मतदार आज त्यांचा मतदानाचा (goa polls) हक्क बजावणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com