crime news, police station, kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: शाहुपुरीत राडा, कोल्हापूरातील बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला; युवकांवर गुन्हा दाखल

पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील शाहुपुरीत बांधकाम व्यावसायिकाला तिघांनी मारहाण करत अचानक चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात बांधकाम व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Maharashtra News)

हा हल्ला वाहन खरेदीच्या आर्थिक देव-घेवीतून झाल्याचे समजतेच. पांडुरंग शंकर गायकवाड (वय 50, रा. केर्ली, ता. करवीर) असे हल्ला झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. दोन ते तीन हल्लेखोरांनी गायकवाड यांचे वाहन थांबवून त्याच्यावर मोठे दगड घातले. त्यामुळे वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास गजबजलेल्या शाहूपुरीत घडला. अचानक मारामारी आणि चाकूहल्ला झाल्याने परिसरात घबराट पसरली. पांडुरंग गायकवाड हे मंगळवारी दुपारी कामानिमित्त शाहूपुरीत आले होते.

घटनास्थळ व पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी : करवीर बेकरीसमोर दोन ते तीन हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली. त्यांनी गायकवाड यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एकाने गायकवाड यांच्यावर चाकूने हल्ला केला.

प्रसंगावधान राखून गायकवाड बाजूला सरकल्याने छातीवर होणारा वार उजव्या दंडावर बसला. याचवेळी इतर हल्लेखोरांनी दगडफेक करून कारच्या काचा फोडल्या. गर्दी जमताच हल्लेखोर पळून गेले. जखमी गायकवाड यांना सीपीआरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

शाहूपुरी पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून हल्ल्याची माहिती घेतली. हल्लेखोर कदमवाडी येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी पांडुरंग गायकवाड यांच्याकडून कार खरेदी केली होती. ही कार चोरीची असल्याने ती पोलिसांनी जप्त केली.

त्यामुळे संशयित हल्लेखोरांनी गायकवाड यांच्याकडे दिलेल्या पैशांची मागणी केली. गायकवाड यांनी मला पैसे मिळाले की, तुम्हाला देतो, असे सांगून टाळाटाळ सुरू केली होती. त्यामुळे संतापलेल्या संशयितांनी हा हल्ला चढविल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी अभिजित गरड याच्यासह त्याच्यासोबत असणार्‍या दोन तरुणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO उतरणार मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT