A tragic scene from Chinchoti village in Beed district where a young farmer lost his life due to an electric shock from a live wire in the field. saam tv
महाराष्ट्र

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Young Farmer Dies Due To Electric Shock In Beed District: बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे शेतातील वीज तारेचा शॉक लागून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप व्यक्त होत असून, चौकशी व नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.

Omkar Sonawane

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील माऊली दिलीप गोंडे (वय २६ वर्षे, व्यवसाय –शेती) या तरुण शेतकऱ्याचा शेतातील वीज पोलवरील विद्युत तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चिंचोटी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महावितरणच्या गलथान कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माऊली गोंडे हे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील वीज पोलवरील तारेला विद्युत प्रवाह असल्याने त्यांना जोरदार शॉक बसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.

या घटनेने गोंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, माऊली गोंडे यांचे वडील दिलीप गोंडे यांचाही सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी गिरणीत दळण दळत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. आता पुन्हा त्याच कुटुंबातील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. माऊली यांच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ असा परिवार असून, कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या तरुणाच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

दरम्यान, शेतातील वीज तारा व पोलची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात महावितरणकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा निष्पाप तरुण बळी गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोटी गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं अचानक स्वस्त! आठवडाभरात ₹10,000 ची घसरण, आजचा भाव किती? वाचा...

Raw Nutmeg: कच्चे जायफळ खाण्याचे भन्नाट फायदे; डोकेदुखी कमी होण्यासोबत शरीराला इतरही होतील फायदे

Sea Fort : चारही बाजूंनी अथांग समुद्र अन् मध्यभागी भव्य किल्ला, मुंबईजवळच आहे दगडी बेटावरचा ऐतिहासिक जलदुर्ग

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला, उभ्या पिकांवरून फिरवला नांगर

Shocking : रात्री दारू पार्टी करून झोपले, सकाळी उठलेच नाहीत, १९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT