

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने किरकोळ वादातून आपल्या प्रेयसीला धावत्या कारमधून रस्त्यावर खेचले आणि त्यानंतर विटेने अमानुषपणे वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
या गंभीर हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली असून, सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. तरूणीवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी आरोपीची ओळख स्वरूप नगर येथील रहिवासी देवाशीष निगम (३८) अशी पटवली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देवाशीषने संस्थेत काम करणाऱ्या महिलेला मुख्य गेटवर बोलावले. तिला घेण्यासाठी गाडी चालवत आयआयटी-कानपूरला गेला होता.
ते दोघे बिठूरमधील ब्रह्मवर्त घाटाकडे जात असताना गाडीतच त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यावर देवाशीषने मंधानाजवळच्या एका सर्व्हिस लेनवर गाडी थांबवली, गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला पडलेली एक वीट उचलली अन् हल्ला केला, असा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. घटनास्थळावर पोलीस पोहचले. त्यावेळी आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावले. "माझी आई एक निवृत्त आयएएस अधिकारी आहे." अशी धमकी पोलिसांना त्याने दिली. डीसीपी (पश्चिम) एस. एम. कासिम अबिदी यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.