Crime News: अंधाराचा फायदा घेत खोलीत आला अन्...; १७ वर्षांच्या मुलीसोबत भावाच्या मेहुण्याने केलं क्रूर कृत्य

Crime News: १७ वर्षीय मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धमकीमुळे पीडिता अनेक दिवस गप्प राहिली. पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Crime News: पानिपत येथील चांदनीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्टर 24 परिसरातील एका कंपनीच्या आवारात घडलेल्या या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 1 जून रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत कंपनीच्या आवारात राहत होती. त्याच ठिकाणी राहणारा रमेश ऊर्फ छोटू हा पीडितेच्या कुटुंबातील नातेवाईक म्हणजे पीडितेच्या भावाचा मेहुणा आहे. त्याने अंधाराचा फायदा घेत मुलीच्या खोलीत प्रवेश केला आणि तिचं तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Crime News
Actor Death: मराठी नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेते- गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरता श्वास

घटना घडल्यानंतर आरोपीने पीडितेला धमकी दिली. जर तिने हा प्रकार कुटुंबातील कोणालाही सांगितला, तर तिच्या भावाचा जीव घेईल, अशी धमकी त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धमकीमुळे घाबरलेल्या पीडितेने अनेक दिवस ही बाब आपल्या पालकांपासून लपवून ठेवली.

Crime News
Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयातून थरार! पत्नी आणि वडिलांवर झाडल्या गोळ्या; संतापाच्या भरात मुलाकडून दुहेरी हत्या

मात्र, घटनेनंतर मुलीच्या वागण्यात झालेला बदल कुटुंबीयांच्या लक्षात आला. ती सतत घाबरलेली, तणावाखाली आणि एकटी राहत असल्याने कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने रडत-रडत आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने चांदनीबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रमेश ऊर्फ छोटू याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64, कलम 351(3) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर आरोपी आपल्या मूळ गावी पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपी फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com