Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयातून थरार! पत्नी आणि वडिलांवर झाडल्या गोळ्या; संतापाच्या भरात मुलाकडून दुहेरी हत्या

Crime News: पत्नी आणि वडिलांवर अनैतिक संबंधांचा संशय घेत मुलाने दोघांची गोळ्या झाडून हत्या केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने कारागृहात पाठवले आहे.
Crime News father in law and daughter in law affairs fake doute son killed both of them
Crime News father in law and daughter in law affairs fake doute son killed both of themAI Image
Published On

Crime News: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा जंक्शन परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. पत्नी आणि स्वतःच्या वडिलांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत मुलाने दोघांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुबीनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला कारागृहात पाठवले आहे.

ही घटना खुर्जा जंक्शन हद्दीतील कलंदरगढी गावात रविवारी दुपारी घडली. आरोपी मुबीनला आपल्या वडील रियाजुद्दीन आणि पत्नी सना यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून घरात वारंवार वाद होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सना हिने १० मे रोजी एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, मुबीनने त्या नवजात बाळाला स्वतःचे मुलं मानण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गंभीर आरोप केले. या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी दोन्ही कुटुंबांमध्ये ‘पंचायत’ भरवण्यात आली होती. बैठकीदरम्यान नातेवाईकांनी मुबीन, त्याची पत्नी सना आणि वडील रियाजुद्दीन यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचायत संपल्यानंतर पुन्हा घरात वाद झाला. संतापाच्या भरात मुबीनने वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलीने आधी वडिलांच्या छातीत आणि नंतर पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली.

Crime News father in law and daughter in law affairs fake doute son killed both of them
Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

गोळीबारानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमी सनाला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रियाजुद्दीन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

Crime News father in law and daughter in law affairs fake doute son killed both of them
Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

या प्रकरणी सनाचे वडील खलील अहमद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला की, लग्नावेळी मुबीन नोकरी करत असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तो बेरोजगार होता. घरातील परिस्थितीमुळे सासरे रियाजुद्दीनच सनाची काळजी घेत असत, याचाच गैरसमज मुबीनच्या मनात वाढत गेला. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले असून सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com