Yavatmal Farmer End Liife Saam Tv
महाराष्ट्र

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत नाव दिसलं नाही, बँकेतून घरी येताच शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Yavatmal Farmer End Life: यवतमाळमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं.

Priya More
  • यवतमाळमध्ये शेतकऱ्याची माहिती

  • यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील घटना

  • कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने उचललं टोकाचं पाऊल

  • विष प्राशनानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

संजय राठोड, यवतमाळ

फडणवीस सरकारने नुकताच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकेमध्ये रांगा लावून शेतकरी आपली कर्जमाफी झाली की नाही हे तपासत आहेत. अशामध्येच यवतमाळमधून एक मन सुन्न करणारी घटना घडली. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव न आल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. राळेगाव तालुक्यातील भांब गावात ही हृदयद्रावक घटना घडली.

राजू बापूराव चुड्डुके (४९ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव होते. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील भांब गावामध्ये ते कुटुंबीयांसोबत राहत होते. हा शेतकरी बँकेमध्ये कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले की नाही हे तपासण्यासाठी गेला होता. पण त्याला यादीमध्ये आपले नाव दिसले नाही. त्यामुळे ते नैराश्येत गेले. बँकेतून घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन करून आयुष्य सपवलं.

राजू चुड्डूके या शेतकऱ्यांच्या कटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावाचा कर्जमाफीच्या यादीत समावेश न झाल्याने ते मानसिक तणावाखाली आले होते. त्यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तसेच चार मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या नावावर मुधापूर उजाड येथे १ हेक्टर ३९ आर शेती आहे.

राजू चुड्डूके यांनी रात्री १० वाजता विष प्राशन केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ राळेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजू यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. या घटनेची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT