Farmer Loan : मोठी अपडेट! कर्जमुक्ती योजनेतील दोन लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

Maharashtra Farmer Loan : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पडताळणीत आतापर्यंत दोन लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील ४ ते ५ हजार कोटी रुपयांचा भार कमी होण्याची शक्यता असून, उर्वरित लाभार्थ्यांची पडताळणी अद्याप सुरू आहे.

MAHARASHTRA FARM LOAN WAIVER UPDATE: 2 LAKH FARMERS DECLARED INELIGIBLE DURING VERIFICATION
MAHARASHTRA FARM LOAN WAIVER UPDATE: 2 LAKH FARMERS DECLARED INELIGIBLE DURING VERIFICATIONSaam Tv
Published On
Summary
  • शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पडताळणीत आतापर्यंत दोन लाख शेतकरी अपात्र

  • अपात्र लाभार्थ्यांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील ४ ते ५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता

  • १७ लाख शेतकरी पात्र ठरले असून उर्वरित १२ ते १३ लाख शेतकऱ्यांची पडताळणी अद्याप सुरू

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार, ३१ जुलैच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे दोन लाख शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील अंदाजे ४ ते ५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने ही योजना जाहीर करताना सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यासाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या निकषांमुळे अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३२ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत १७ लाख शेतकरी पात्र, तर दोन लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. उर्वरित १२ ते १३ लाख शेतकऱ्यांची पडताळणी अद्याप सुरू असून, अंतिम आकड्यात अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


MAHARASHTRA FARM LOAN WAIVER UPDATE: 2 LAKH FARMERS DECLARED INELIGIBLE DURING VERIFICATION
Ladki Bahin Yojana : खात्यात 1500 येईना, लाडकींचे टेन्शन वाढले; मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार TAX भरणारे शेतकरी, आजी-माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, ठराविक मर्यादेपेक्षा अधिक निवृत्तिवेतन घेणारे, तसेच सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांतील वरिष्ठ अधिकारी यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.


MAHARASHTRA FARM LOAN WAIVER UPDATE: 2 LAKH FARMERS DECLARED INELIGIBLE DURING VERIFICATION
GEN - G आंदोलनात बहरलं प्रेम; बिहारच्या तरुणाने दिल्लीतील विद्यार्थिनीशी बांधली लग्नगाठ

दरम्यान, सरकारने २०१९ मधील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन लाभाची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापूर्वी कर्जमाफी मिळाल्यानंतर पुन्हा थकीत झालेल्या १२ ते १३ लाख शेतकऱ्यांनाही आता दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आता अपात्र शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं असून सरकार पुढे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com