निसर्गाचा लहरीपणा, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यातच गगनाला भिडलेली महागाई... या दुष्टचक्रात सापडलेला आपला बळीराजा सध्या किती हतबल झालाय, याचं मन सुन्न करणारं चित्र जळगाव जिल्ह्यातून समोर आलंय. बैलजोडी भाड्यानं घ्यायला किंवा खरेदी करायला पैसे नव्हते, म्हणून रडत न बसता, दोन सख्ख्या भावांनी स्वतःलाच नांगराला जुंपून घेतलं आणि चार एकर शेत नांगरून काढलं...
हा व्हिडिओ जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या कुऱ्हाड खुर्द गावचा आहे. डोळयात पाणी आणणारं, पण त्याच वेळी परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन उभं राहण्याची जिद्द दाखवणारं हे चित्र आहे... गरिबीनं सगळं काही हिरावून घेतलं, पण या कुटुंबाचा स्वाभिमान हिरावून घेऊ शकला नाही. कपाशीच्या लागवडीसाठी शेत तयार करायचं होतं, पण पदरात दमडीही नव्हती. बाजारात बैलजोडी आणायची तर 80 हजार ते 1 लाख रुपये हवेत. अखेर बैल नाही म्हणून हतबल न होता, गणेश आणि विनेश या दोन भावांनी स्वतःच 'बैल' होत औत ओढण्याचा धाडसी निर्णय घेतला.
संतोष रतन माळी यांनी उमरदे शिवारात दुसऱ्याची 4 एकर शेती कसण्यासाठी घेतली आहे. मात्र, आर्थिक संकटामुळे त्यांच्याकडे बैल खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. ट्रॅक्टर किंवा बैलजोडी भाड्याने घेणेही आवाक्याबाहेर होते. अशा वेळी बापाची हतबलता मुलांनी पाहिली आणि स्वतःलाच औताला जुंपून घेतलं. भर उन्हात दिवसभर या बाप-लेकांनी 4 एकर शेतात कपाशीसाठी सऱ्या पाडल्या.
मात्र परिस्थिती कितीही बिकट असली, तरी या दोन भावांनी दाखवलेली जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी 'गरिबी हरली आणि जिद्द जिंकली' याचीच साक्ष देते. तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गप्पा मारतं मात्र जमिनीवरील वास्तव वेगळंच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.