Yavatmal Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime News: यवतमाळ हादरलं! घरात युवतीचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह; पोलिसांना घातपाताचा संशय

यवतमाळमध्ये एका इमारतीमधील एका खोलीत २४ वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे

Vishal Gangurde

संजय राठोड

Yavatmal Crime News: यवतमाळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये एका इमारतीमधील एका खोलीत २४ वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने यवतमाळमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या वणी घुग्गुस मार्गावरील शिव मंदिरापासून जवळच असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट मधील एका खोलीत चोवीस वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

खोलीमधून दुर्गंधी येत असल्याने घर मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची पाहणी केली. त्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोही वैभव बारस्कर (२४) व आरोही वानखडे अशी दोन नावे असलेली आधारकार्ड मृतक युवतीजवळ आढळून आले आहे.

या तरुणीचे माहेरचे नाव कोणते व सासरचे कोणते हा संभ्रम निर्माण झाला आहे. तिचे कुटुंबीय आल्यानंतरच तिच्या नावाची स्पष्टता होईल असे सांगण्यात येत आहे. ही युवती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील निंबी या गावची रहिवासी असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.

युवतीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT