Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

Marathi Breaking Live Headlines Updates : दिल्लीत सीजीपीचे आंदोलन, ज्ञानेश कुमार, महाराष्ट्रात राजू शेट्टींचे ऊस दरवाढीसाठी आंदोलन, नवरात्रौउत्सव, राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात,असं मिश्कील विधान चंद्रकांत पाटलांनी केले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज वैध ठरल्यानंतर आज सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची भेट झाली, त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांना कॅडबरी भेट देऊन अभिनंदन केलं.

पुणे शिक्षक मतदारसंघात एकही लायक उमेदवारी सापडला नाही; सचिन सानप यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

जे राजकीय पक्ष स्वतःला मोठे समजतात,त्यांना पुणे शिक्षक मतदारसंघात एकही लायक उमेदवारी सापडला नाही,ही खंत आहे,अशा शब्दात पुढे शिक्षक मतदार संघातील शिवसेना शिंदे पक्षाचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांनी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तसेच आपल्या उमेदवारीला एकनाथ शिंदे यांनी युतीच्या शिष्टाचाराला छेद देऊन पाठिंबा दिलाय,त्यामुळे ही निवडणूक शिक्षक प्राध्यापकांच्या स्वाभिमानाचा लढा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

नाशिकच्या मालेगाव सह परिसरात आज पावसाने हजेरी लावल्याने अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळ पडला असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाअभावी पिके करपली, तर काही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सुरू झालेल्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या जमिनीला काही प्रमाणात ओलावा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

भारत सोडण्याच्या नोटीस विरोधात इम्रान खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव

भारत सोडण्याच्या नोटीस विरोधात

अभिनेता इम्रान खानाची मुंबई उच्च न्यायालयात धाव

इम्रानच्या वतीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल

गेल्या शनिवारी ऑगस्ट क्रांती मैदानात केलेल्या आंदोलनात इम्रान खान झाला होता सहभागी

आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी इम्रान खान विरोधात गुन्हा दाखल

Foreigners and immigration कायद्याच्या अटी शर्थींच उल्लंघन झाल्याप्रकरणी इम्रान खानला देश सोडण्याची मुंबई पोलिसांची नोटीस

कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे सायडिंगवरील झोपड्या ३० दिवसांत रिकाम्या करण्याचे आदेश

मध्य रेल्वे प्रशासनाकडून रहिवाशांना नोटिसा पाठवण्यात आलाय.

३५०० रहिवाशांवर निष्कासनाच्या कारवाईची टांगती तलवार

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ ऑक्टोबरला नोटिसा आणि बॅनर लावले

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला प्रतिसाद; शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदेंचा सवाल

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. संघटनशक्तीच्या बळावर निवडणूक लढवत असून आपल्याकडे धनशक्ती किंवा संस्थांची शक्ती नसल्याचे त्यांनी सांगितले.

उजनी जलाशयात भव्य देशी मत्स्यबीज संचयन सोहळा; स्थानिक मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुन्या भिगवण येथे उजनी जलाशयात भव्य देशी मत्स्यबीज संचयन सोहळा उत्साहात पार पडला. BNHS आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मत्स्यबीज जलाशयात सोडण्यात आले.

संविधानाच्या रक्षणासाठी सोलापुरात ‘तिरंगा लहरा दो’ आंदोलन; दिल्लीतील अटकेचा निषेध

सोलापुरातील जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे ‘सीजेपी सोलापूर’च्या वतीने संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ‘तिरंगा लहरा दो’ आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शांततापूर्ण आंदोलनादरम्यान सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना अटक केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

जोगेश्वरी पूर्वेत मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; महिला प्रवासी जखमी 

मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेकडील दुर्गानगर परिसरात नमस्कार बस स्टॉपजवळ मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडल्याने अपघात झाला. रस्त्याखालील पाण्याच्या लाईनच्या चेंबरचे झाकण खचल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत बेस्ट बसचे मोठे नुकसान झाले असून एका महिला प्रवाशाच्या पायाला दुखापत झाली.

सोलापुरात भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी कार्यकर्त्यांची झुंबड! व्हिडिओ व्हायरल 

सोलापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमानंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

पुण्यात सीजेपी कार्यकर्त्यांचे ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी दाखल झाले. ‘लहरा दो तिरंगा’चा नारा देत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

अभिजीत दिपकेंना जामीन मंजूर

  • CJP चे संस्थापक अभिजीत दिपकेंना जामीन मंजूर

  • SEM कोर्टाकडून अभिजित दिपकेंना जामीन

  • कोर्टाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • अटिशर्तींसह अभिजीत दिपकेंना जामीन

विधान परिषद निवडणुकीत जनतेचे प्रश्न मांडणारा प्रतिनिधी निवडा; देवेंद्र फडणवीस यांचे पदवीधर मेळाव्यात आवाहन

पदवीधर मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार असून, विधान परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक, पदवीधर, नोकरदार, अभियंते, डॉक्टर आणि वकिलांचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी निवडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, कागल आणि पन्हाळा परिसरात विजांचा कडकडाट होत असून, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भीम आर्मीचे दादरमध्ये आंदोलन

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत भीम आर्मीकडून दादर परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर येथील चैत्यभूमी परिसरात हे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत मिळणार : एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. त्यानंतर सरकारने दुष्काळ जाहीर केला. दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातील. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, असं आम्ही सांगितलं होतं. त्यानुसार शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांना मदत करताना सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मदतीबाबत आश्वासन दिलं आहे. केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

डी.लिट. मानद पदवी स्वीकारताना देवेंद्र फडणवीसांची नम्र भावना; पदवीधर विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

  • डी.लिट. ही मानद पदवी स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नम्र भावना.

  • डॉक्टर ऑफ लेटर्स ही मानद पदवी प्रदान करण्यासाठी योग्य समजल्याबद्दल विद्यापीठाचे मानले आभार.

  • पीएच.डी. पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक.

  • पीएच.डी.धारकांच्या कठोर परिश्रमांची जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले नमूद.

  • पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन.

  • दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील विशेष दिवस; नव्या जीवनप्रवासाची सुरुवात असल्याचे प्रतिपादन.

शिर्डीत ATM कार्ड बदलून तरुणीची आर्थिक फसवणूक; दोघांचा कारनामा CCTV मध्ये कैद

शिर्डीत ATM कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन तरुणांचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या तरुणीला, तिच्या आईच्या खात्यातून पैसे कट झाल्याचं सांगत या दोघांनी मदतीच्या बहाण्याने गंडा घातला.

यावेळी तरुणीच्या ATM कार्डची अदलाबदल करून तिच्या खात्यातून तीन हजार रुपये काढण्यात आले. खात्यातून पैसे कट झाल्याचं लक्षात येताच तरुणीने शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या दोघांनी आणखी नागरिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका महायुती म्हणून लढवत आहोत : सुप्रिया सुळे

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढवत आहोत. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेत आहोत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, निवडणुकांमध्ये अशा घडामोडी होत असतात. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल आमच्या मनात आदर आणि प्रेम आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

संजय राऊत साहेब मला दिल्लीत रोज भेटत असतात. मात्र, सुषमाताईंनी नेमकं काय म्हटलं, याची मला माहिती नाही. रावसाहेबांबाबतची माहिती मी तुम्हाला पाठवते, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ शिंदे यांची सभा होणार आहे. या सभेतून ते सरनाईक यांच्या प्रचाराला बळ देण्याचा प्रयत्न करणार असून, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरही भाष्य करण्याची शक्यता आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या लढतीकडे महायुतीचे लक्ष लागले आहे. किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे कोणती रणनीती मांडतात आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष असणार आहे.

ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

ठाण्यातील उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला आहे. या घटनेत एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

जळगावात १० टक्के पाणी कपातीचा निर्णय; महापौर दीपमाला काळे अधिकाऱ्यांवर संतापल्या

जळगाव शहरात महापालिका प्रशासनाकडून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची माहिती महापौर दीपमाला काळे यांना देण्यात आली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच सुनावले आणि पुन्हा असा प्रकार घडू नये, अशी तंबी दिली. प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी भूमिका महापौरांनी घेतल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज डी.लिट.ची मानद पदवी प्रदान होणार

अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) यांच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी.लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळातच उपस्थित राहणार आहेत. या समारंभात त्यांना मानद पदवी देऊन गौरवण्यात येणार असून, कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का; सुनंदा आवताडेंसह २०० पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे भाजपने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, माजी डीसीसी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह सुमारे २०० पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सहकारी संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.

अहिलनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोधेगाव येथील सुरेश अहिरे हे १५ तारखेच्या रात्रीपासून बेपत्ता होते. दोन दिवसांनंतर शेतात त्यांच्या शरीराचे काही अवयव आढळून आले. बिबट्याने त्यांना शेतात ओढून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पिंपरीत ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, वाहतुकीचा मोठा खोळंबा

पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये शनिवारी पहाटे कंटेनर अडकल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या घटनेत पुलाच्या स्लॅबचे मोठे नुकसान झाले असून, कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अवजड वाहनांच्या उंचीची मर्यादा निश्चित असतानाही नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने उंच वाहनांना रोखणारी यंत्रणा कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वसई पूर्वेत उघड्या गटारात पडून दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

वसईच्या वालीव परिसरातील उघड्या गटारात पडून दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नंदुरबार बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत पडाशी येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. परवानाधारक कापूस खरेदीदारांमार्फत ही खरेदी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी १३ वाहनांमधून १०० क्विंटल कापसाची आवक झाली. या कापसाला कमाल १० हजार रुपये, तर किमान ९ हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळात कापसाला किती भाव मिळतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांसह दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांसह दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात आलंय.

तुकाराम राऊत यांच्या घरासमोरील अंगणात बिबट्याने पाच शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून, गाईही जखमी झाल्याची माहिती आहे.

इंटरनेट वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क

इंटरनेट वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की इंटरनेट वापरणे व ते मिळवणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे

संजय राऊत यांच्या "बोध किर्तन" या पुस्तकाचे 31 ऑक्टोबरला प्रकाशन

संजय राऊत यांच्या "बोध किर्तन" या पुस्तकाचे 31 ऑक्टोबरला प्रकाशन

नरकातला स्वर्ग नंतर संजय राऊत यांचे "बोध कीर्तन" हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे

बोध किर्तन या पुस्तकाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार

कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केल्याप्रकरणी FDA चे 6 अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केल्याप्रकरणी FDA चे 6 अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

कारवाई करून संबंधित आस्थापनांना रिलीफ दिल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

FDA मंत्री नरहरी झिरवळ ऍक्शन मोडवर

बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

उसाला ५० रुपये आणि इथेनॉलला ७० रुपये दर देण्यासाठी केंद्र सरकार यांच्याशी चर्चा करावी - शेतकऱ्यांची भूमिका

उसाला ५५०० रुपये दर देण्याची देखील शेतकऱ्याची भूमिका

Mumbai: वांद्रे पूर्वेतील एसआरए कार्यालयात नागरिकांचा खोळंबा

मुंबई - वांद्रे पूर्वेतील एसआरए कार्यालयात नागरिकांचा खोळंबा

प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि ओटीपीची सुविधा सुरू

कमी नेटवर्कमुळे ओटीपी येण्यास विलंब होत असल्याची नागरिकांची तक्रार

प्रवेशद्वारावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा

रखरखत्या उन्हात नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र

एसआरए कार्यालयात दररोज विविध कामांसाठी शेकडो नागरिकांची ये-जा

Sangli: सांगलीमध्ये हळदीच्या दरात वाढ कायम, ३१ हजार १०० रुपये उच्चांकी दर

सांगलीमध्ये हळदीच्या दरामध्ये वाढ कायम आहे. शुक्रवारी पार पडलेल्या हळदीच्या सौद्यांमध्ये ३१ हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव हळदीला मिळाला आहे.

गेल्या आठवड्यापासून हळदीला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सौदया मध्ये चांगला दर मिळत आहे.

प्रति क्विंटल ३० हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला होता. त्यामध्ये आता आणखी वाढ होऊन ३१ हजार १०० रुपये इतका दर हळदीला मिळाला आहे.

Beed: मनोज जरांगेंचा नारायण गडावर तर पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर होणार दसरा मेळावा 

बीड जिल्ह्यात होणार २ दसरा मेळावे

मनोज जरांगे यांचा नारायण गडावर तर पंकजा मुंडे यांचा भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा

श्री क्षेत्र नारायण गड येथील मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी आयोजकांकडून परवानगीसाठी शिरूर कासार पोलिसांना पत्र

buldhana: शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन सुडी पेटवण्यात आली, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बुलडाणा -

शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन सुडी पेटवली

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान..

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा तालुक्यातील हातडी येथील घटना..

Pune: पुण्यात आज 'लहरा दो तिरंगा' मोहिम

पुण्यात आज 'लहरा दो तिरंगा' मोहिम

सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोहीम

मोठ्या संख्येने सीजेपी कार्यकर्ते येण्याची शक्यता

पोलिसांनी मोहिमेला परवानगी दिली आहे.

त्यामुळे सायंकाळी या मोहिमेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता..

Pune: जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळमध्ये भातशेती संकटात

- जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळमध्ये भातशेती संकटात

- ⁠दोन ते अडीच महिने पावसाची ओढ

- 55 हजारो हेक्टरवरील भातपीक करपलं

- बियाणे, मजुरी, ट्रॅक्टरचा खर्च वाया

- दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचं संकट

- मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा?

- सातबारा धारकांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी

Pimpari: भाजप नगरसेविकेवर गुन्हा दाखल करा, पिंपरी चिंचवड महापालिकेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

भाजप नगरसेविका तृप्ती संतोष कांबळेवर गुन्हा दाखल करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची पोलिस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे मागणी

पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 32 येथील त्या नगरसेविका आहेत

तृप्ती संतोष कांबळे यांच्याविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Nanded: नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ

नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ.

एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन

Mumbai: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम?

विमान प्रवासाच्या तिकिटांचे मनमानी दर आणि अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम अंतिम केले

दोन आठवड्यांत ते जाहीर केले जातील, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिली.

खासगी विमान कंपन्यांच्या मनमानी दरांविरोधात दाखल जनहित याचिकेवर न्यायालयाने सरकारला १६ नोव्हेंबरपर्यंत नियम सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Amravati: अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक, वंचित बहुजन आघाडीची आज महत्वाची बैठक

अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज बाद झाल्याने आता वंचितचा पाठिंबा कोणाला?

शिंदे सेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष दूत वंचितच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलणी करण्यासाठी पाठवल्याची सूत्राची माहिती

वंचितचा पाठिंबा कोणाला असेल याबाबत आज प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती

Dharashiv: धाराशिवमधील हातलाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यात साकारली दुष्काळाचे वास्तव मांडणारी रांगोळी

धाराशिव -

धाराशिवमधील हातलाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यात साकारली दुष्काळाचे वास्तव मांडणारी रांगोळी

तहानलेली धरती,हतबल बरीराजा.. रांगोळीच्या माध्यमातून साकारत 'आई' दुष्काळातुन तुच बाहेर काढ गं..! आणि एक थेंब पाण्याचा,किती लाख मोलाचा! अशा ह्रदयस्पर्शी संदेश देत दुष्काळाची दाहकता दाखवली

धाराशिव मधील कलायोगी आर्ट्सचा वतीने 110 किलो रांगोळीतुन माध्यमातून मांडली दुष्काळाची विदारक परिस्थिती

Nagpur: सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागला, नागपूर ते मुंबई प्रवासासाठी मोजावे लागणार २२,८०० रुपये

नागपूर-

- सणासुदीच्या काळात विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

- दसरा-दिवाळीच्या तोंडावर विमान तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ

- नागपूर-मुंबई विमान प्रवासाचे भाडे २२ हजार ८०० रुपयांपर्यंत

- मुंबई ते नागपूर विमान तिकिटासाठी १५ हजार ते २२ हजार ८०० रुपये मोजावे लागतायत

Washim: शेतात विहिर नसतानाही असल्याचे कारण देत सिंचन विहिरीचे प्रस्ताव रद्द

शेतात आणि सातबारावर विहिर नसतानाही, विहीर असल्याचे कारण देत शेतकऱ्यांचे सिंचन विहिरीचे प्रस्ताव केले रद्द

मालेगाव पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा प्रताप

प्रस्ताव मंजूरसाठी लाच न दिल्याने फाईल ६ महिने रेंगाळत ठेवून अखेर रद्द केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Navi Mumbai: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी ४५,००० रुपयांची बोनस महासभेत सर्वानुमते मंजूर

एकसमान सानुग्रह अनुदान देणारी नमुंमपा ठरली पहिली महानगरपालिका

नवी मुंबईतील सरसकट सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ४५ हजार रुपये बोनस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.