Virar Crime News: धक्कादायक! आईचा डोळा लागताच ४ वर्षीय मुलाला पळवले; लोहमार्ग पोलिसांकडून एकास अटक

तक्रारीनंतर सीसीटीव्हीमुळे या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Virar News
Virar NewsSaam TV
Published On

Virar Railway Station Crime: विरार रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमधून चार वर्षीय मुलाला पळवून नेणाऱ्या आरोपीला वसई लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आईचा डोळा लागल्यानंतर चोरट्याने मुलाला पळवून नेले होते. तक्रारीनंतर सीसीटीव्हीमुळे या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Crime News In Marathi)

Virar News
Anil Parab On kirit somaiya: प्रकरण अंगाशी आलं म्हणून मागे घेतलं; अनिल परबांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी चार वाजल्याच्या सुमारास चार वर्षीय मुलगा व त्याची आई रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत बसले होते. यावेळी आईचा अचानक डोळा लागला व या गोष्टीचा फायदा घेत आरोपी शमशाद मानसुरी (21) चालत्या लोकलचा फायदा घेत मुलाचे अपहरण केले. या धक्कादायक प्रकारानंतर महिलेने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. (Latest Marathi News)

आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासकार्यास सुरूवात केली. यावेळी रेल्वे स्थानकावर असलेल्या सर्व सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता आरोपीचा शोध लागला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला सीएसटी येथून अटक करत लहान मुलाला आईच्या ताब्यात दिले. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून आरोपीने अजून काही गुन्हे केले आहेत का?याचा वसई लोहमार्ग पोलिस तपस करत आहेत. (Crime News)

Virar News
Dhule Accident News: पायी जाणाऱ्या इंजिनीअर तरुणाला वाहनाची धडक; एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

रिक्षा चालकांना लुबाडणाऱ्या दोघांना अटक...

दरम्यान, डोंबीवलीमधून (Dombivli) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशी बनून रिक्षात बसल्यानंतर प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुबाडणाऱ्या दोन जणांना विष्णू नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सागर पारेख, संपतराज जैन अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने व मोबाईल असा सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com