Anil Parab On kirit somaiya: प्रकरण अंगाशी आलं म्हणून मागे घेतलं; अनिल परबांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

Political News: किरीट सोमय्यांनी याचिका मागे घेतल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना परबांनी खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे.
Anil Parab Kirit Somaiya Contraversy
Anil Parab Kirit Somaiya ContraversySaam Tv
Published On

निवृत्ती बाबर

Maharashtra Politics News: गेल्या काही दिवसांपासून अनिल परब यांचं नाव साई रिसॉर्ट प्रकरणी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. या प्रकरणी भाजपकडून परबांविरोधात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मात्र आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. किरीट सोमय्यांनी याचिका मागे घेतल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना परबांनी खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधलाय. साई रिसॉर्ट प्रकरणी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "मी सुरवातिपासून साई रिसॉर्ट बद्दल सांगत होतो की, माझा काही संबंध नाही. पण जाणूनबुजून माझ्यावर खोटे आरोप केले गेले. या प्रकरणात गैर व्यवहाराचे पैसे लावले असा आरोप केला, पर्यावरनाचा ऱ्हास केला असा आरोप केला. ईडीने आमची चौकशी केली, गेली दीड वर्ष या प्रकरणात माझी नाहक बदनामी झाली. "

Anil Parab Kirit Somaiya Contraversy
Pune Fire News: मोठी बातमी! इमारतीला भीषण आग; 30 नागरिक इमारतीतच अडकले

" याबद्दल मी हायकोर्टात दावा दाखल केला आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आपल्या अंगाशी येतंय म्हणून प्रकरण मागे घेतायत. अनेक प्रकरण हायकोर्टात आहेत त्यामध्ये पण यांना जर कळलं तर तेही मागे घेतले जातील. ज्या रिसॉर्टवरून दावे केले जातायत ते चुकीचे आहेत. मुख्य गुन्हा होता त्याची ईडीने चौकशी सुरु केली त्यानंतर आणखी दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे खोटे आहेत याविषयी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे, असं अनिल परब म्हणाले.

लवकरच लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. अशात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिंगे गटाला सातत्याने सावधगिरीचे सल्ले दिले जात आहेत. तसेच शिंदे- भाजप सरकारमध्ये भाजप शिंदेंना कशा प्रकारे मागे टाकणार याबाबत मोठी विधाने करत आहेत. (Latets Marathi News)

Anil Parab Kirit Somaiya Contraversy
Maharashtra Political News: भाजपात रामदास आठवलेंचाच शब्द चालणार...; बड्या नेत्याचं विधान

शिंदे गटात कोणी आवाज चढवला तर त्यांच्या नाड्या दाबल्या जातील कारण डिसक्वॉलिफीकेशन भाजपच्या हातात आहे. लोकसभेला त्यांनी 22 जागा मागितल्या आहेत निवडणुका लागूद्या मग कळेल की कितीजण शिंदे कडून लढतायत आणि कितीजण भाजपकडून (BJP) लढतील ते पाहा, असा टोलाही अनिल परब (Anil Parab) यांनी लगावला आहे. शिवसेनेत त्यांची घुसमट होत होती म्हणून ते तिकडे गेले आहेत किती जण कशावर लढतील ते पाहा, असं विधान देखील शिंदे गटावर टीका करताना परबांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com