Uttar Pradesh Crime News: बुरखा घालून गर्लफ्रेंडला भेटायला गेला; मुलं चोरणारा समजून लोकांनी बदडलं

Uttar Pradesh Crime News: रस्त्यावरून चालत असताना एका महिलेला त्याचा संशय आला. या महिलेने त्याची चौकशी केल्यानंतर त्याचं बिंग फुटलं.
Uttar Pradesh Crime News:
Uttar Pradesh Crime News:Saam TV

Uttar Pradesh Crime News: प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. प्रेयसीला किंवा प्रियकराला भेटता यावं, म्हणून अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या शोधतात. काहीवेळा त्यांचा जुगाड चालून जातो, पण जेव्हा हा जुगाड पकडला जातो तेव्हा मात्र फजिती होते. असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला आहे.  (Latest Marathi News)

प्रेयसीला भेटता यावं म्हणून एका तरुणाने अनोखा जुगाड केला. प्रेयसीला तर भेटायचं पण आपल्याला कुणी ओळखलं नाही पाहिजे म्हणून त्याने बुरखा घातला. पायात लेडीज चप्पल देखील घातली. हलका मेकअप करून तो प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला.

Uttar Pradesh Crime News:
Ambernath Crime News: अंबरनाथ हादरलं! मूलबाळ होत नसल्यानं पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य

मात्र, रस्त्यावरून चालत असताना एका महिलेला त्याचा संशय आला. या महिलेने त्याची चौकशी केल्यानंतर त्याचं बिंग फुटलं. मग काय रस्त्यावरील नागरिक एकत्र जमले आणि त्यांनी या तरुणाची चांगलीच धुलाई केली. भररस्त्यात प्रियकराची धुलाई होताना पाहून प्रेयसीने मध्यस्थी केली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस (Police) ठाण्यापर्यंत पोहचलं.

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा प्रकार उत्तरप्रदेशात घडला आहे. उत्तरप्रदेशातील घाटमपूर भागात राहणाऱ्या एका तरुणाचं परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत सूत जुळलं होतं. दोघेही एकमेकांना दररोज भेटत होते. मात्र, त्यांच्या कुटुंबियांना प्रेमाची कुणकुण लागली. (Breaking Marathi News)

त्यांनी दोघांच्याही प्रेमाला विरोध केला. त्यामुळे प्रियकर आणि प्रेयसीला एकमेकांना भेटता येत नव्हतं. तरी सुद्धा त्यांचं फोनवरून बोलणं सुरू होतं. आता आपण यापुढे लपून छपून भेटायचं असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार, सदरील तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून जाऊ लागला.

Uttar Pradesh Crime News:
Pune Crime News: वर्दीला काळीमा! पोलीस हवालदारानेच केला महिलेवर बलात्कार; धक्कादायक घटनेनं पुण्यात खळबळ

सुरूवातील एक दोन वेळा त्यांची भेट झाली. मात्र, रविवारी तो पुन्हा प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला असताना, परिसरातील एका महिलेला त्याच्या चालण्यावरून संशय आला. या महिलेने त्याला हटकले असता, तो काहीही बोलला नाही.

त्यामुळे महिलेचा संशय अधिकच बळावला. तिने बुरखा उचलून पाहिले असता ती महिला नसून पुरुष असल्याचे निष्पन्न झाले, लोकांनी त्या व्यक्तीचे आधारकार्ड पाहिले असता त्याचे नाव अन्सार असल्याचे निष्पन्न झाले. मग काय मुलं चोरणारा समजून लोकांनी त्याची चांगलीच धुलाई केली.

भररस्त्यात आपल्या प्रियकराची धुलाई होत असल्याचं पाहून प्रेयसी घाबरली. तिने मध्यस्थी करून तो मलाच भेटायला आल्याचं लोकांना सांगितलं. मात्र, तरी देखील लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. अखेर रस्त्यावर झालेला गोंधळ पाहून पोलिस आले आणि दोघांनाही घेऊन गेले. या संपूर्ण प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com