pune crime news married women physical abuse by police constable pune shocking incident
pune crime news married women physical abuse by police constable pune shocking incidentSaam TV

Pune Crime News: वर्दीला काळीमा! पोलीस हवालदारानेच केला महिलेवर बलात्कार; धक्कादायक घटनेनं पुण्यात खळबळ

Pune Crime News: एका पोलीस कर्मचाऱ्याने तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडवेल, अशी धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे.
Published on

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. पीडित महिलांकडून फिर्याद प्राप्त झाल्यानंतर पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

इथे एका पोलीस कर्मचाऱ्याने तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडवेल, अशी धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

pune crime news married women physical abuse by police constable pune shocking incident
Dombivali Crime News: इन्स्टाग्रामवरील मैत्री महिला पोलिसही फसली; लग्नाचे वचन देऊन तरुणाने केलं भलतंच कांड

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी (Police) संशयित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल अशोक मद्देल (वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.मद्देल हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वडगाव शेरी भागातील शिवराणा प्रताप पोलिस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. तेथे तिची पोलिस हवालदार मद्देल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने मुलगा आणि पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार (Pune Crime News) केले. तसेच तिच्याकडून त्याने वेळोवेळी पैसे उकळले.

pune crime news married women physical abuse by police constable pune shocking incident
Wardha Accident News: साडीचा पदर बाइकच्या चेनमध्ये अडकून मायलेकी रस्त्यावर पडल्या, पाठीमागून टँकर आल्यानं अनर्थ घडला

दरम्यान, मद्देल याने पीडित महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नाही तर, महिलेसह तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध खंडणी उकळल्याची फिर्याद दिली आहे. मद्देलने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी तसेच अन्य कारणांसाठी वेळोवेळी दोन लाख ३५ हजार रुपये घेतले. पैसे परत मागितल्यानंतर महिलेने बलात्कार केल्याची खोटी तक्रार दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले, असे पोलिस हवालदार राहुल मद्देल याने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com