World Richest Beggar Saam TV
महाराष्ट्र

Worlds Richest Beggar: ७.५ कोटींची संपत्ती, २ मुलं कॉन्वेंट शाळेत शिकतात, मुंबईतील श्रीमंत भिकाऱ्याची पाहा गोष्ट

Worlds Richest Beggar in Mumbai: तुम्हाला खरं नाही वाटणार, पण मुंबईतील हा भिकारी दिवसाला अडीच हजार कमावतो. उच्चभ्रू भागात आहे अलिशान घर. त्यांचे वडिल ८० लाखांच्या फ्लॅटमध्ये राहतात.

Bhagyashree Kamble

भिकारी हा शब्द कुणी उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर काय येईल? अर्थात मळलेले, फाटके कपडे, अस्वच्छ अवतारातील व्यक्ती. मात्र, आपण कधी श्रीमंत भिकारी व्यक्तीबद्दल ऐकिवात आहात का? आता तुम्ही म्हणाल भीक मागून कुणी श्रीमंत होऊ शकतं का? तर, हो. भरत जैन नावाचा भिकारी भीक मागून दिवसाला हजारो रूपये कमावतो. त्यांचं लग्न झालं असून, त्यांची दोन्ही मुलं कॉन्वेंट शाळेत शिकतात. या अजब भिकारी व्यक्तीची चर्चा सध्या पुन्हा सोशल मिडियात होत आहे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची किंवा शिक्षण न घेतल्यामुळं काही जणांवर भीक मागण्याची वेळ येते. मात्र, काही जणांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. भरत जैन हा एक उत्तम उदाहरण आहे. मुंबईत दोन वेळचं जेवण मिळण्यासाठीही खटाटोप करावी लागते. मात्र, भरत जैन दिवसभरात भीक मागून हजारो रूपये कमावतो. एका मिडिया रिपोर्टनुसार, मुंबईत भीक मागून उदरनिर्वाह करणारा भरत जैन जगातील सर्वात श्रीमंत भिकारी आहे.

भरत जैन यांची एकूण संपत्ती ७.५ कोटी इतकी आहे. ते भीक मागून महिन्याला ६० ते ७५ हजार कमावतात. तसेच त्यांच्याकडे १.४ कोटी रूपयांचे मुंबईत फ्लॅट आहे. तर, ठाण्यात त्यांनी दोन दुकाने खरेदी केली आहेत. यामुळे त्यांना महिन्याला ३० हजार रूपये भाडे मिळते. नोकरदार वर्ग ८-१२ तास काम करूनही हजारो रूपये कमवत नाहीत. परंतु, लोकांच्या मेहरबानीमुळे भरत १० - १२ तासात २ ते अडीच हजार कमावतात.

भरत जैन यांचे लग्न झालेले आहे. त्यांना २ मुलं आहेत. दोन्ही मुलं कॉन्वेंट शाळेत शिक्षण घेतात. भरत यांचे कुटुंब १ बीएचके डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतात. तर, भरत यांचे वडिल ८० लाखांच्या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांचे कुटुंब भीक न मागण्याची विनंती करतात. पण कुटुंबियांचे न ऐकता, ते रोज भीक मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स आणि आझाद मैदानावर जातात. भरत यांच्या कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT