Beggar Buying iphone: दुनियेतला सर्वात श्रीमंत भिकारी! गोनीभर चिल्लर देऊन खरेदी केला iPhone; व्हिडीओ तुफान VIRAL

Beggar Buying iphone Video Viral: रस्त्यावर भीक मागून आपलं पोट भरणाऱ्या व्यक्तीने iphone घेतला असं म्हटलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही.
Beggar Buying iphone
Beggar Buying iphoneSaam TV
Published On

Bhikari Purchase Iphone Video:

सध्या तरुणाईमध्ये आयफोनची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकजण काटकसर करून आयफोन खरेदी करतात आणि आपली हौस पूर्ण करतात. महागडा आयफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशात रस्त्यावर भीक मागून आपलं पोट भरणाऱ्या व्यक्तीने iphone घेतला असं म्हटलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. एका भिकारी व्यक्तीने स्वत: चिल्लर जमा करून आयफोन खरेदी केला आहे. (Latest Viral Video)

Beggar Buying iphone
iPhone 15: iPhone 15 लॉन्च होताच14 झाला इतका स्वस्त, किंमत ऐकून व्हाल अवाक्

सोशल मीडियावर या व्यक्तीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. रस्त्यावर अनेक व्यक्ती दोन वेळच्या जेवणासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात. परिस्थितीमुळे त्यांच्यावर अशी वेळ येते. मात्र या वेळेला देखील छेद देण्याची हिंमत उराशी बाळगून एका भिकारी व्यक्तीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

त्याने दोन ते तीन गोन्या भरून भीक मागून पैसे जमवलेत. यामध्ये एकही नोट नाही. सर्व दोन, पाच आणि १० रुपयांची नाणी आहेत. ही सर्व चिल्लर घेऊन हा व्यक्ती आयफोन शॉपमध्ये आलाय. शॉपमध्ये येताच इतर व्यक्ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात.

मला आयफोन खरेदी करायचा आहे असं हा भिकारी व्यक्ती सांगतो. त्यानंतर त्याच्या गोनीमधील सर्व चिल्लर बाहेर काढली दाते. तब्बल २ ते ३ तास दुकानातील कर्मचारी चिल्लर मोजत असतात. शेवटी आयफोनसाठी लागतील इतके पैसे या व्यक्तीकडे असल्याचे समजल्यानंतर त्याला फोन दिला जातो.

@Experimentking या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओची शहानीशा केली असता समजते की, हा एक बनावट व्हिडीओ आहे. भिकारीच्या कपड्यांमध्ये आलेल्या तरुणाने स्वत:च असा लूक करून आयफोन विकत घेतला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने हा फन व्हिडीओ पोस्ट केलाय.

Beggar Buying iphone
iPhone 15 : संकटकाळी आयफोन येईल धावून, नव्या फीचरमुळे होणार मदत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com