आयफोन ही मोबाईलच्या क्षेत्रातील खूप मोठी कंपनी आहे. या वर्षातील सर्वात महागडा आणि बहुप्रतीक्षित आयफोन 15 आता भारतात लाँच झाला आहे. 12 सप्टेंबरला अॅपलचा वंडरलस्ट हा आयफोन 15चा इव्हेंट झाला. आयफोन 15चा परिणाम मात्र आयफोन 14वर झाला आहे.
अनेकांना आयफोन घ्यायची इच्छा असते परंतु कधी बजेट नसते. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयफोन 14 ची किंमत आता कमी झाली आहे. त्यामुळे तुम्ही आयफोन 14, आयफोन 14 प्लस स्वस्तात खरेदी करु शकता.
आयफोन 15 सीरीज लाँच झाल्यानंतर लगेचच आयफोन 14 ची किंमत घसरली. 10,000 रुपयांनी आयफोन 14 सवस्त झाला आहे. या फोनची नवीन किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आली आहे.
आयफोन 14ची नवी किंमत
आयफोन 14 128GB 69,900Rs.
आयफोन 14 256GB 79,900Rs.
आयफोन 14 512GB 99,900Rs.
आयफोन 14 प्लस 128GB 79,900Rs.
आयफोन 14 प्लस 256GB 89,900Rs.
आयफोन खरेदीच्या एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डवर 8000 रुपयांची सूट मिळणार आहे.
आयफोन 15 स्पेसिफिकेशन
आयफोन 15 भारतात लाँच झाला असून फोनची प्री बुकिंग 15 तारखेपासून सुरू होणार आहे. फोनची विक्री २२ सप्टेंबरपासून भारतात सुरू होणार आहे. आयफोन 15 मध्ये काही नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
iPhone 15 ची 128GB स्टोरजची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. iPhone 15 मध्ये 6.1 इंचचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन A16 चिपसेटवर काम करेल. यात मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 48MP कॅमेरा तर 12MP टेलिफोटो लेन्स असेल. 12MP हा फ्रंट कॅमेरा असेल. तर आयफोन 15 प्लसची किंमत 89,900 रुपये आहे. यात 6.7 इंचचा कॅमेरा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.