Mumbai Hotels : मुंबईतील 90 टक्के हॉटेलमधील गलिच्छपणा उघड, FDAच्या तपासणीत धक्कादायक वास्तव उघड

Mumbai Hotels News : मुंबईतील खाद्य संस्कृतीचा वाटा असणारे मुख्य स्त्रोत हे हॉटेल आहे.
Mumbai Hotels
Mumbai HotelsSaam Tv
Published On

News Of Mumbai Hotels :

मुंबईकरांना खाण्याचा बराच शॉक आहे. त्यामुळे लोक सतत चवीचा आस्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणी जातात. मुंबईतील खाद्य संस्कृतीचा वाटा असणारे मुख्य स्त्रोत हे हॉटेल आहे. हॉटेलचे पदार्थ जसे आपल्याला चविष्ट आणि स्वच्छ ठिकाणी बनवलेले लागतात, तसेच तेथील स्वच्छताही नीटनेटकी असावी अशी आपली अपेक्षा असते.

आपण हॉटेलला जाण्यापूर्वी नेहमी त्याची स्वच्छता आणि पदार्थांचे रिव्ह्यूव्ह पाहून जातो. आशातच आता मुंबईतील (Mumbai) हॉटेल्सच्या या पडताळणीत अन्न व औषध प्रशासन विभागाने (FSDA) ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता केलेली नाही. अशा 90 टक्के हॉटेल्समध्ये सुधारणा आवश्यक आहे असे दिसून आले.

FSDAने हॉटेल्सना सुधारणांसाठी नोटिस बजावले आहेत, तर 2 हॉटेल्सवर कारवाई करून ती बंद केले आहेत. 13 ऑगस्ट रोजी वांद्रे येथील हॉटेल पापा पांचो दा ढाबा येथे एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये मृत उंदीर आढळून आला होता. या घटनेनंतर ग्राहकाने पोलिसात गुन्हा दाखल केला.

खाद्यपदार्थात भेसळ आणि निष्काळजीपणा केल्याने एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची घटना आढळल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर FSDAने कारवाईत केले. FSDAने ढाब्याची पाहणी केली. FSDAच्या तपासणीत अनेक नियमांचे (Rules) उल्लंघन आढळले, त्यानंतर हॉटेल तात्पुरते बंद करण्यात आले.

Mumbai Hotels
Mera Bill Mera Adhikar Yojana : सरकार देतेय करोडपती बनण्याची संधी! या लकी ड्रॉमध्ये कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर

ताटात उंदीर सापडल्याची घटना समोर आल्यानंतर एफडीए आयुक्तांनी विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईतील एकूण 13 झोनच्या अन्न निरीक्षकांना त्यांच्या परिसरातील हॉटेल्सची तपासणी सुरू करण्याचे आदेश दिले. FSDAच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 17 दिवसांत एकूण 68 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.

हॉटेलमध्ये नियम पाळले जात नाहीत

तपासणी दरम्यान 64 हॉटेल्समध्ये नियमांचे उल्लंघन करण्याचे आढळून आले, तर दोन हॉटेल्समध्ये अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांना दंड आकारण्यात आला.

याशिवाय दोन हॉटेल्स तातडीने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. FSDAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, FSSAI च्या नियमांनुसार हॉटेल्सना 90 ते 100 नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, परंतु हॉटेल्समध्ये काही नियमांचे पालन केले जात नसल्याचे तपासात समोर आले आहे.

अशा परिस्थितीत हॉटेल्सना (Hotel) त्यांच्या चुका भरून काढण्याची संधी देण्यात आली आहे. सुधारणा करण्यासाठी नोटीस पाठवूनही सुधारणा न झाल्यास FSDAच्या कायद्यांतर्गत उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये त्यांना दंडही भरावा लागू शकतो किंवा त्यांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.

महेश झगडे, माजी FSDA आयुक्तांनी सांगितले, FSDAच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. यामुळे इतर हॉटेल मालकांना संदेश जाईल की नियमांचे पालन न केल्यास त्यांनाही शिक्षा होऊ शकते. हॉटेल्सनी प्रत्येक नियम पाळला पाहिजे. यामध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये. शेवटी ही बाब लोकांच्या आरोग्याशी निगडित आहे.

काय दोष आढळले

एका फूड इन्स्पेक्टरने सांगितले की हॉटेलचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हॉटेल्सची चेक लिस्ट असते, त्यात 80 ते 90 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तपासणीत अनेक हॉटेल्समध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आला. काही स्वयंपाकघर अस्वच्छ तर काही उघडे डस्टबिन होते, तर नियमानुसार डस्टबिनवर झाकण असायला हवे होते. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातात ग्लोव्हज आणि डोक्यावर टोप्या घालाव्या लागतात. वरील दोन गोष्टींसोबतच शेफलाही एप्रन घालावे लागते, मात्र तपासादरम्यान अनेक हॉटेल्स तसे करत नसल्याचे आढळून आले.

हॉटेल्सच्या तपासणीचे काम अजूनही सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. असे FSDAचे सहआयुक्त शैलेश आढाव असे म्हणतात.

दोन हॉटेलवर दंड

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे फिटनेस प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराने ग्रासलेले नसल्याचे स्पष्ट होते. तपासादरम्यान अनेक हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांकडे प्रमाणपत्र आढळून आले नाही, त्यामुळे या हॉटेलांना त्यांची चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. एफडीएचा परवाना नसलेल्या हॉटेलांना काम बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. तर दोन हॉटेलमध्ये अधिक चुका आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

Mumbai Hotels
Why Do Hotels Check Out At 12pm | हॉटेलचे चेक-इन केव्हाही पण चेक-आऊट दुपारी 12 वाजताच का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com