Mera Bill Mera Adhikar Yojana : सरकार देतेय करोडपती बनण्याची संधी! या लकी ड्रॉमध्ये कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर

How To Upload GST Bill For Mera Bill Mera Adhikar Yojana: केंद्र सरकारने जीएसटी बिलांची संख्या वाढवण्यासाठी 'मेरा बिल मेरा अधिकार योजना ' सुरू केली आहे.
Mera Bill Mera Adhikar Yojana
Mera Bill Mera Adhikar YojanaSaaam Tv
Published On

मेरा बिल मेरा अधिकार योजना:

देशातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. यासोबतच सरकार अनेक आकर्षक ऑफर्सही देतात. यावेळी केंद्र सरकारने जीएसटी बिलांची संख्या वाढवण्यासाठी 'मेरा बिल मेरा अधिकार योजना ' सुरू केली आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. सरकारने या योजनेद्वारे 1 कोटी रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चला, या योजनेची सविस्तर माहिती घेऊया.

'मेरा बिल मेरा अधिकार' योजना काय आहे?

अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की 'मेरा बिल मेरा अधिकार' या योजनेंतर्गत लोकांना 1 कोटी रुपयांचे बक्षीस सोबत इतर अनेक बक्षिसे मिळणार आहेत. सरकार (Government) दर महिन्याला या योजनेत 800 लोकांची निवड करेल. हे 800 लोक असे असतील जे दर महिन्याला त्यांचे GST बिल अपलोड करतील. या 800 लोकांना 10,000 रुपयांचे बक्षीस आहे.

Mera Bill Mera Adhikar Yojana
Vidhwa Pension Yojana : विधवा पेन्शनसाठी अर्ज करताय? ही कागदपत्रे आवश्यक, अन्यथा पैसे मिळण्यात येईल अडथळा

या 800 लोकांव्यतिरिक्त, सरकार 10 लोकांची देखील निवड करेल ज्यांना 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जातील. 1 कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ केवळ 2 लोकांनाच मिळणार आहे. या योजनेचा लाभ फक्त त्या व्यापाऱ्यांनाच मिळेल जे तिमाही आधारावर जीएसटी (Goods And Service Tax) बिले अपलोड करतील.

यासाठी व्यापाऱ्यांना त्यांचे GST बिल हे मेरा बिल मेरा अधिकार या अ‍ॅपवर अपलोड (Upload) करावे. या व्यतिरीक्त अधिकृत वेबसाइट web.merabill.gst.gov.in यावर जाऊन GST बिल अपलोड करू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्यांना किमान 200 रुपयांचे जीएसटी बिल अपलोड करावे लागेल.

ही योजना का सुरू करण्यात आली?

अधिकाधिक लोकांना GST बिल घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरकारने ही योजना (Scheme) आणली आहे. याशिवाय जीएसटी बिलात वाढ होईल हे देखील कारण आहे. करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरेल.

जेणेकरून अधिकाधिक लोकांना GST बिल घेण्यास प्रवृत्त करता येईल. याशिवाय जीएसटी बिलात वाढ हेही कारण आहे. सरकार करबूडवेपणाला आळा घालण्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय या योजनेतून सरकारच्या उत्पन्नातही वाढ होईल.

GST बिल कसे अपलोड करावे?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मेरा बिल मेरा अधिकार अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल . तुम्हाला अ‍ॅप वापरायचे नसेल तर तुम्ही web.merabill.gst.gov.in वर जाऊ शकता.

  • यानंतर तुम्हाला तुमचे GST बिल अपलोड करावे लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किमान 200 रुपयांचे GST बिल अपलोड केले पाहिजे.

  • या योजनेत वापरकर्ता एका महिन्यात केवळ 25 जीएसटी बिले अपलोड करू शकतो.

योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळणार?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला (GSTIN) इनव्हॉइस क्रमांक, बिलाची रक्कम, कराची रक्कम आणि तारीख इत्यादी माहिती भरावी लागेल. याशिवाय या योजनेचा लाभ घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मेरा बिल मेरा अधिकार अ‍ॅपवर त्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती अपलोड करावी. विजेत्याला ही सर्व माहिती 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल.

Mera Bill Mera Adhikar Yojana
Swadesh Darshan Yojana : केंद्र सरकारची 'स्वदेश दर्शन योजना' नक्की काय आहे? कसा होतो उपयोग? वाचा उद्देश आणि वैशिष्ट्ये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com