Vidhwa Pension Yojana : विधवा पेन्शनसाठी अर्ज करताय? ही कागदपत्रे आवश्यक, अन्यथा पैसे मिळण्यात येईल अडथळा

How To Apply Vidhwa Pension Yojana : ही योजना विधवा महिलांसाठी योग्य ठरत असून सध्या करोडो विधवा महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
Vidhwa Pension Yojana
Vidhwa Pension YojanaSaam Tv
Published On

Vidhwa Pension Yojana :

दरवर्षी राज्य सरकारांपासून ते केंद्र सरकारपर्यंत विविध लाभदायक आणि कल्याणकारी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. या योजनांच्या माध्यमातून शहरी भागातून ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब आणि गरजू लोकांना लाभ दिला जातो. अशीच एक योजना म्हणजे विधवा निवृत्ती वेतन.

या योजनेंतर्गत गरीब आणि निराधार विधवा महिलांना (Women) दरमहा 600 ते 900 रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. ही योजना विधवा महिलांसाठी योग्य ठरत असून सध्या करोडो विधवा महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा स्थितीत, जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही सहभागी होऊ शकता. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Vidhwa Pension Yojana
National Pension Scheme : बायकोच्या नावाने उघडा हे अकाऊंट, केवळ 1000 रुपयात मिळवा दर महिना 45000 पर्यंत फायदा

पात्रता -

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

  • अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.

  • अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहीजे.

  • अर्जदार दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असावा.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 65 वर्ष वर्षांपेक्षा कमी असावे.

कागदपत्रे -

  • आधार कार्ड

  • मतदार ओळखपत्र

  • पत्त्याचा पुरावा (घरपट्टी, विजबील)

  • वय प्रमाणपत्र

  • उत्पन्न प्रमाणपत्र

  • जात प्रमाणपत्र

  • पतीचा मृत्यू प्रमाणपत्र

  • बँक खाते पासबुक

  • मोबाईल नंबर

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Vidhwa Pension Yojana
Senior Citizen Pension : वयोवृद्धांना दरमाह घरबसल्या मिळणार 4500 रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.

  • सर्वप्रथम, अर्जदाराला अधिकृत वेबसाइटवर (Website) जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर समोर असलेल्या मुख्यपृष्ठाला उघडा, यावर महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या अर्जाचा PDF आहे तो डाउनलोड करावा.

  • हा अर्ज डाउनलोड केल्यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. आणि नंतर, तुमची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा.

  • यानंतर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी येथे जाऊन अर्ज सादर करावा.

फॉर्म कसे पहावे?

  • फॉर्मसाठी ही वेबसाइट तुमच्या डिव्हाइसवर उघडा.

  • त्यानंतर होम पेजवरील 'फॉर्म' या पर्यायावर क्लिक करा .

  • क्लिक केल्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल.

  • या पृष्ठावर, तुम्हाला सर्व फॉर्म (Form) उघडले जातील.

  • तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही फॉर्मवर तुम्ही क्लिक करू शकता.

  • तुम्हाला हवे असल्यास त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com